मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

खुलताबाद जर जरी बक्ष उरूस यात्रोत्सव भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्या – जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

On: July 19, 2026 4:40 PM
Follow Us:
---Advertisement---

जर जरी बक्ष उरूस यात्रोत्सव भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्या– जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर, दि. 17 (जिमाका) – खुलताबाद येथील हजरत ख्वाजा जर जरी बक्ष उरूस यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना आरोग्य, पिण्याचे पाणी, वीज, एसटी बस, स्वच्छतागृहे इ. सुविधांची प्राधान्याने उपलब्धता करून द्यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी आज दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित उरूस यात्रेच्या पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.

 

पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, उपविभागीय अधिकारी कन्नड संतोष गोरड, तहसीलदार खुलताबाद संतोष गुट्टे, मुख्याधिकारी समीर शेख, नगराध्यक्ष अमीर पटेल, दर्गा समितीचे अध्यक्ष इजाज अहमद, उपाध्यक्ष इमरान जहागिरदार, सदस्य सचिव कामरान अहमद तसेच इतर सदस्य उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी गौडा यांनी सांगितले की, उरूसासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी.

 

उरूस कालावधीत वाहनतळ, राहटपाळणे व इतर मनोरंजनाच्या साधनांमुळे गर्दी होणार नाही, यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

 

यंदा उरूस आणि श्रावण महिना एकाच कालावधीत असल्यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन विभागाने वाहतूक व्यवस्थापनावर विशेष लक्ष द्यावे, तसेच खुलताबाद शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

 

उरूस काळात तहसील कार्यालय आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती, महावितरण, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, खुलताबाद नगरपालिका यांनी समन्वयाने काम करुन यात्रा सुरळीत व सुरक्षितपणे पार पाडावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी गौडा यांनी दिल्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment