सोयगाव : बोधिस्त्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या त्यागाची जाणीव ठेऊन गावा – गावात बौद्ध धम्म पोहचावावा – डॉ.राजाराम बडगे
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
सोयगाव / प्रतिनिधी यासीन बेग
बोधिस्त्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या कुटंबियांनी समाजाच्या उत्थानसाठी केलेल्या त्यागाची जाणीव ठेऊन भारतीय बौद्ध महासभेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी गावा – गावात बौद्ध धम्म पोहचवावा.त्यासाठीं तन मन व धन लाऊन जोमाने कार्य करण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी – डॉ.राजाराम बडगे यांनी रविवारी (दी.१९) कन्नड येथील भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी कार्यकर्ता प्रशिक्षण व चिंतन शिबिरात केले.
छ्त्रपती संभाजीनगर पुर्व जिल्हा अध्यक्ष अरविंद कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली त्रीरत्न बौद्ध विहार हिवरखेडा रोड कन्नड येथे रविवारी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण व चिंतन शिबिर घेण्यात आले.
यावेळी मंचावर ट्रस्टी डॉ.राजाराम बडगे,राज्य संघटक किशोर जोहरे.जिल्हा अध्यक्ष अरविंद कांबळे,जिल्हा सरचिटणीस भीमराव साळवे,जिल्हा कोषाध्यक्ष प्रकाश हिवराळे,जिल्हा उपाध्यक्ष भारत पगारे सोयगाव.
मुदांक शुल्क जिल्हाधिकारी जी.बी. सातदिवे,पी.एस.आय.अजय पानपाटील,
तालुका अध्यक्ष रमेश धनेधर. सोयगाव तालुका महिला शाखा अध्यक्ष सुशीला इंगळे.
तालुका सरचिटणीस लता अवचार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ट्रस्टी डॉ.राजाराम बडगे,राज्य संघटक किशोर जोहरे.जिल्हा अध्यक्ष अरविंद कांबळे,जिल्हा सरचिटणीस भीमराव साळवे जिल्हा कोषाध्यक्ष प्रकाश हिवराळे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षित केले.
या प्रशिक्षण शिबिरात जिल्हा संघटक सुभाष जाधव,जिल्हा संघटक माणिक पगारे,
जिल्हा हिशोब तपासनीसविनोद अंभोरे,
जिल्हा उपाध्यक्ष संरक्षण लेफ्टनंट कर्नल कचरू दांडगे, जिल्हा (सचिव संरक्षण) अमोल साळवे. बोधाचार्य सी. बी.पवार, तालुका अध्यक्ष सोयगाव मुकुंदा वाहूले. सरचिटणीस अशोक साबळे,सिल्लोड तालुका अध्यक्ष के.आर.दुबे. तालुका सरचिटणीस श्रावण अंभोरे, कन्नड तालुका सरचिटणीस राजू अवचार यांच्यासह पत्रकार सहयोग जावळे संदीप सातदिवे रिपाई तालुका अध्यक्ष(आठवले गट) सुनील शिरसाट वंचित कन्नड तालुका अध्यक्ष,राहुल सातदिवे,रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष,पत्रकार अनिल शिरसाट, वंचित बहुजन आघाडी निरीक्षक साहेबराव चौतमल आणि कचरू मेंगाळ तसेच भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी, महीला आघाडीचे शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमांत भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक राजेंद्र पगारे हे ग्राम पंचायत अधिकारी व माजी तालुका अध्यक्ष रतन घोरपडे हे मुख्याध्यापक पदावरुन नियतकाळानुसार शासकीय सेवेतून सेवा निवृत्ती झाल्याबद्दल त्यांचा ट्रस्टी राजाराम बडगे यांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात येऊन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या सूत्र संचालन जिल्हा कार्यालयीन सचिव (केंद्रीय शिक्षक) शंकर कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा अध्यक्ष अरविंद कांबळे यांनी मानले शेवटी सरणतय घेण्यात आले.
फोटो ओळ :- सोयगाव – कन्नड येथील भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी कार्यकर्ता प्रशिक्षण व चिंतन शिबिरात मार्गदर्शन करतांना ट्रस्टी राजाराम बडगे व राज्य संघटक किशोर जोहरे मंचावर उपस्थित पदाधिकारी
दुसऱ्या छायाचित्रात कन्नड येथील भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी कार्यकर्ता प्रशिक्षण व चिंतन शिबिरात उपस्थीत प्रशिक्षणार्थी







