मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

छत्रपती संभाजीनगर येथे बनावट आधार कार्ड तयार करणाऱ्या झेरॉक्स चालकाला पोलिसांकडून अखेर अटक !

On: July 22, 2026 10:06 AM
Follow Us:
---Advertisement---

छत्रपती संभाजीनगर येथे बनावट आधार कार्ड तयार करणाऱ्या झेरॉक्स चालकाला पोलिसांकडून अखेर अटक !

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर शहरातील बनावट हिबानामा प्रकरणात गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने मोठी कारवाई करत आधार कार्डमध्ये फेरफार करणाऱ्या आणि बनावट रबरी शिक्के बनवणाऱ्या एका झेरॉक्स दुकानदाराला बेड्या ठोकल्या आहेत. शोहेब खान सादुल्ला खान ( वय ३१, रा. नारेगाव, गल्ली क्रमांक १ ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी शोहेब खान सादुल्ला खान हा सिडको परिसरातील कॅनॉट येथे मराठवाडा एंटरप्रायजेस जम्बो झेरॉक्स नावाने दुकान चालवत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.

 

या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, बुऱ्हाणी कॉलनी येथील रहिवासी अली असगर सैफुद्दीन पेटीवाला ( वय ५८ ) यांची हिरापूर शिवारातील गट क्रमांक ३१ मधील २ हेक्टर ११ आर एवढी मोक्याची शेतजमीन बेकायदेशीरपणे बळकावण्यासाठी मुख्य सूत्रधार मोहम्मद नूर मोहम्मद हनीफ आणि एजंट अब्दुल काशिद ऊर्फ जुनेद खान यांनी कट रचला होता. या टोळीने २७ मे रोजी दस्त नोंदणीच्या वेळी मूळ जमीन मालक अली असगर सैफुद्दीन पेटीवाला यांच्याऐवजी मालेगाव येथील हबीब सालेह या तोतया व्यक्तीला उभे करून स्वतःच्या नावे बनावट हिबानामा नोंदवून घेतला होता.

 

यापूर्वी गुन्हे शाखेने कारवाई करत मुख्य आरोपी मोहम्मद नूर मोहम्मद हनीफ, एजंट अब्दुल काशिद ऊर्फ जुनेद खान आणि तोतया आरोपी हबीब सालेह या तिघांना अटक केली होती. पोलिसांच्या कोठडीत असताना आरोपी हबीब सालेह याने चौकशीदरम्यान मोठा खुलासा केला. त्याने दिलेल्या माहितीनुसार, कॅनॉट येथील मराठवाडा एंटरप्रायजेस जम्बो झेरॉक्स दुकानातून फिर्यादी अली असगर सैफुद्दीन पेटीवाला यांच्या सहीचा बनावट रबरी स्टॅम्प बनवून घेण्यात आला होता आणि आधार कार्डमध्येही फेरबदल करण्यात आला होता.

 

रजिस्ट्री कार्यालयात तोतया व्यक्ती उभी करण्यासाठी आरोपींनी शोहेब खान सादुल्ला खान याची मदत घेतली होती. शोहेब खान सादुल्ला खान याने मूळ आधार कार्डवरील फोटो व नाव बदलून त्या जागी मालेगाव येथील तोतया इसम हबीब सालेह याचा फोटो लावला. कोणालाही शंका येऊ नये म्हणून त्याने आधार कार्डवर दुसराच किंवा पूर्णपणे बनावट क्रमांक टाकला होता. एका बनावट आधार कार्डसाठी तो तब्बल १५ हजार रुपये उकळत असे आणि अवघ्या १ तासात हे बनावट कार्ड बनवून देत होता. छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक बोगस रजिस्ट्री प्रकरणांमध्ये अशाच प्रकारे बनावट आधार कार्ड पुरवल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे.

 

या खुलाशांनंतर गुन्हे शाखेच्या पथकाने १७ जुलै रोजी मराठवाडा एंटरप्रायजेस जम्बो झेरॉक्स दुकाणावर छापा टाकला. या छाप्यात दुकानातून फिर्यादीच्या सहीचा बनावट स्टॅम्प तसेच आधार कार्ड फेरफारासाठी वापरलेला संगणक जप्त करण्यात आला. त्यानंतर आरोपी शोहेब खान सादुल्ला खान याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २० जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सदर कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक सचिन देशमुख, गणेश शिंदे, अभिजित गायकवाड, परमेश्वर भोकरे आणि कृष्णा शिंदे यांच्या पथकाने केली.

 

जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात तंत्रज्ञानाचा गैरवापर करून बनावट कागदपत्रे आणि आधार कार्ड तयार करण्याचे वाढते प्रकार अत्यंत चिंताजनक आहेत. प्रशासनाने अशा बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या झेरॉक्स सेंटर आणि एजंटांवर अधिक कडक पाळत ठेवणे काळाची गरज बनली आहे.

 

⚠️ महत्त्वाची नोंद – कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहिती इनबॉक्स करा. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की मेसेज मध्ये संपर्क साधा ! – Dainik shabdmat

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment