मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

आंबेडकरवादी संघटनांचा विजय; नामांतर शहीद स्मारकाचे निकृष्ट बांधकाम पाडण्यास सुरुवात

On: July 23, 2026 9:40 AM
Follow Us:
---Advertisement---

 

 

आंबेडकरवादी संघटनांचा विजय; नामांतर शहीद स्मारकाचे निकृष्ट बांधकाम पाडण्यास सुरुवात

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी | दि. २२ जुलै २०२६

 

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात शासनाच्या निधीतून उभारण्यात येत असलेल्या नामांतर शहीद स्मारकाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाविरोधात आंबेडकरवादी संघटनांनी उभारलेल्या तीव्र आंदोलनाला अखेर यश मिळाले. सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित स्मारकाचे निकृष्ट बांधकाम पाडण्याची कारवाई बुधवारी सकाळपासून सुरू केली.

 

या स्मारकाच्या निकृष्ट कामाबाबत आंबेडकरवादी बहुजन विकास समिती आणि विविध आंबेडकरवादी संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवत, तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सार्वजनिक बांधकाम विभाग व शासनाला दिला होता. आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एस. भगत, कार्यकारी अभियंता शेषराव चव्हाण आणि उपअभियंता ढाकणे यांनी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत घटनास्थळी भेट देऊन सकाळपासून निकृष्ट बांधकाम हटविण्याची प्रक्रिया सुरू केली.

 

जेसीबीच्या साहाय्याने स्मारकाचे बांधकाम पाडण्यास सुरुवात होताच उपस्थित कार्यकर्त्यांनी नामांतर शहीद आणि महापुरुषांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या कारवाईनंतर उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

 

यावेळी आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचे अध्यक्ष दीपक निकाळजे (छत्रपती संभाजीनगर) यांनी नामांतर आंदोलनातील शहीदांच्या बलिदानाचा उल्लेख करत, “शहीदांचे बलिदान कधीही व्यर्थ जाऊ देणार नाही. सामाजिक अस्मितेवर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही. आंबेडकरी चळवळ शेवटच्या श्वासापर्यंत सुरू राहील,” असा इशारा दिला.

 

निकृष्ट बांधकाम पूर्णपणे हटविले जाईपर्यंत मुसळधार पावसातही कार्यकर्ते घटनास्थळी ठामपणे उपस्थित राहिले.

 

या वेळी प्रांतोष वाघमारे, अमित वाहूळ, राहुल वडमारे, सचिन निकम, नागेश केदारे, मिलिंद दाभाडे, जयश्री शिरके, पवन पवार, कपिल बनकर, सोनू नरवडे, संतोष चव्हाण, शुभम मगरे, कृष्णा शरणागत, राष्ट्रपाल गवई, राजकुमार कांबळे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि विविध आंबेडकरवादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

छोटे पंढरपूर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमले; आषाढी एकादशी उत्साहात साजरी

जि.प. प्रशाला सोयगाव येथे गुणवंत विद्यार्थी यांचा सन्मान सोहळा

सोयगावच्या पर्यटन विकासाला चालना; रुद्रेश्वर लेणी, वाडी किल्ला, गंगाधार धबधबा व जंजाळा किल्ल्याची पर्यटन विभागाकडून पाहणी

विकसित भारत @2047 च्या दिशेने छत्रपती संभाजीनगरची भक्कम वाटचाल ‘सिटी ट्रान्सफॉर्मेशन युनिट’मुळे शहर विकासाला नवी दिशा; ‘मित्र’ संस्थेसोबत लवकरच सामंजस्य करार

दर्गावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात उलेमा बोर्डाची कारवाई; पोलिसांकडे एफआयआरची मागणी

अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा इशारा; गुंठेवारी नियमितीकरणासाठी 31 जुलैपर्यंत 90 टक्के सवलत

Leave a Comment