मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

सावळदबारा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती उत्साहात साजरी…

On: July 23, 2026 9:58 AM
Follow Us:
---Advertisement---

सावळदबारा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती उत्साहात साजरी..

 

 

 

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

सोयगाव / प्रतिनिधी यासीन बेग

 

 

 

 

 

सावळदबारा जय कालिंका देवी शिक्षण प्रसारक संस्था संचलित छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच कै. लक्ष्मणराव भीमराव कोलते पाटील वरिष्ठ महाविद्यालय, सावळदबारा येथे महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला.संस्थेचे अध्यक्ष भाऊराव कोलते यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचा व राज्याच्या जडणघडणीत दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजविकासासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.

जयंतीनिमित्त शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी लावलेल्या वृक्षांचे संगोपन व संरक्षण करण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.प्रा. जीवन कोलते यांनी अजित पवार यांच्या सार्वजनिक, प्रशासकीय व विकासात्मक कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयसिंह राजपूत व भास्कर खमाठ यांनी केले, तर विकास पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास संस्था पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment