मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

सोयगाव : दिल्ली येथील विद्यार्थी आंदोलनातील अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ सोयगाव येथे कडकडीत बंद पाळून निषेध,.

On: July 23, 2026 9:12 PM
Follow Us:
---Advertisement---

सोयगाव : दिल्ली येथील विद्यार्थी आंदोलनातील अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ सोयगाव येथे कडकडीत बंद पाळून निषेध,

 

 

 

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

सोयगाव / प्रतिनिधी यासीन बेग

 

 

 

 

 

दिल्ली येथील जंतर मंत्तर मैदानावर लोकशाही व शांततेच्या मार्गाने २० जुलैला काढण्यात आलेल्या विद्यार्थी रॅलीवर भाजपा महायुतीच्या सरकारने पोलिस व गुंडाकडून अमानुष मारहाण केली.यात एक विद्यार्थिनीचा मुर्त्यू व शेकडो विद्यार्थी गंभीर जखमी झाले.या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी यांनी गुरूवारी (दी.२३) महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.

सोयगाव येथे त्या अन्यायाच्या विरोधात व चालू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीतर्फे गुरूवारी सोयगाव येथे सकाळी ६ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळून निषेध पाळण्यात आला. बंद दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही.बंद शांततेत पाळण्यात आला.

सोयगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार घालून सर्व पक्ष व संघटनाच्या तर्फे वालमिकपुरा – नारळी बाग – मार्गे छ्त्रपती शिवाजी महाराज चौक भव्य रॅली काढण्यात आली होती.छ्त्रपती शिवाजी महाराज चौक येथे रॅलीचे रूपांतर सभेत झाले. यावेळी सर्व पक्षीय संघटनेचे वंचीतचे माजी तालुका अध्यक्ष सिध्दार्थ मोरे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष रवींद्र काळे,तालुका अध्यक्ष दीपक देशमुख,कृष्णा पाटील,काँग्रेसचे राजेंद्र काळे,आदिवासी संघटनेचे शेख गुलाब मामु,भारतीय बौद्ध.महासभेचे जिल्हा संघटक सुभाष जाधव,महीला तालुका अध्यक्ष सुशिला इंगळे, तालुका अध्यक्ष मुकुंदा वाहुळे,कवी अनिल शेळके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.त्यांनतर सोयगावचे नायब तहसीलदार संभाजी देशमुख,एपीआय दिनकर गोरे यांना निवेदन देण्यात आले.

आंदोलनात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा), समता सैनिक दल व भीम आर्मी सेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,आदिवासी संघटना,व्यापारी संघटना व रिपब्लिकन सेनेसह आंबेडकरीवादी समविचारी पक्ष संघटना. सहभागी यांनी सहभागी होत बंद यशस्वी केला.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पूर्व तालुका अध्यक्ष सचिन शिंदे, पश्चिम तालुका अध्यक्ष गणेश सोनवणे,तालुका समन्वयक मनोहर जगताप,मगरे,भीम आर्मी तालुका अध्यक्ष राजू वानखेडे,शेख बबलू व दीपक नवगीरे व पगारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सचिव भारत पगारे यांनी तर आभार वांचीतचे सिध्दार्थ मोरे यांनी मानले.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे यासाठी सपोनी दिनकर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गजानन आरेकर व सोयगाव पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

 

चौकट : सोयगाव बंद दरम्यान एस टी आगारा तर्फे बाहेर गावी जाणाऱ्या एस टी बस सेवा सुरळीत ठेवण्यात आली होती.तसेच बसस्थानकावर प्रवाशी व जनतेसाठी बंद आयोजकांच्या वतीने पिण्याच्या पिण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

चौकट :-

बनोटी येथेही बंद पाळून निषेध :-

तालुक्यातील बनोटी येथेही वंचित बहुजन आघाडी,शिवसेना व मित्र पक्ष व व्यापारी संघटनांनी कडकडीत बंद पाळून दिल्ली येथील जंतर मंतर मैदांवर विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष माराहाणीचा तीव्र निषेध करण्यात आला.

फोटो ओळ :- सोयगाव – दिल्ली येथील विद्यार्थी आंदोलनातील अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ सोयगाव येथे पाळण्यात आलेला कडकडीत बंद

फोटो ओळ : सोयगाव – दुसऱ्या छायाचित्रात नायब तहसीलदार संभाजी देशमुख व सपोनी दिनकर गोरे यांना निवेदन देतांना सर्वपक्षीय शिस्टमंडळ,

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment