मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

जि.प. प्रशाला सोयगाव येथे गुणवंत विद्यार्थी यांचा सन्मान सोहळा

On: July 25, 2026 8:52 AM
Follow Us:
---Advertisement---

जि.प.प्रशाला सोयगाव येथे गुणवंत विद्यार्थी यांचा सन्मान सोहळा

 

 

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

सोयगाव / प्रतिनिधी यासीन बेग

 

 

 

 

 

 

जिल्हा परिषद प्रशाला सोयगाव येथे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन एन एम एस )परीक्षा गुणवंत विद्यार्थी व इस्त्रो सहल निवड झालेले विद्यार्थी वैष्णवी कडुबा ढगे,देवयानी गोपाल आवटे,नेहा शिवदास आस्वार , अक्षरा परशुराम पंडित,पलक भागवत गायकवाड,देवयानी निलेश मिसाळ,तेजस समाधान भोकरे,गायत्री भगवान बावस्कर,पूजा शिवाजी बावस्कर,प्रांजली राजेंद्र खलसे,वृषाली गोपाल साळुंके,पार्थ समाधान इंगळे या विद्यार्थ्यांचा व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक श्री भास्कर चौधरी,सचिन ढगे ,संगीता सोनवणे मुख्याध्यापक श्री दादाराव राठोड यांचा जिल्हा परिषद छ संभाजीनगर चे सदस्या (आमखेडा गट) सौ पुष्पाताई प्रकाश काळे यांचे मार्गदर्शनातून व सौ तेजस्विनी ताई काळे यांचे संकल्पनेतून स्वातंत्र्य सेनानी बाबुरावजी काळे गुणवत्ता पुरस्कार देऊन या विद्यार्थ्यांना व गुरुजनांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ पुष्पाताई काळे होत्या तर प्रमुख अतिथी सभापती श्री उत्तमभाऊ चव्हाण, गोंदेगाव गट जिल्हा परिषद सदस्य सुनीताताई चव्हाण यांचे पती शेखर भाऊ चव्हाण,पंचायत समिती सदस्य जयश्री पवार याचे पती गजानन पवार सामाजिक कार्यक्रम संकल्पक तेजस्विनीताई काळे सामाजिक कार्यकर्ते संजय शहापूरकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील ठोंबरे उपाध्यक्ष भारती भागवत गायकवाड,सदस्य वाल्मीक चव्हाण व सर्व पदाधिकारी,माजी विद्यार्थी संघाचे प्रा निलेश गाडेकर व पदाधिकारी ,खरेदी विक्री संघाचे संचालक मयूर मनगटे,शिक्षण प्रेमी अरुण सोहनी,विजय गव्हाड,गटशिक्षणाधिकारी यांचे तर्फे केंद्र प्रमुख श्री फिरोज तडवी,मुख्याध्यापक जंगला तांडा रामदास फुसे ,केंद्र शाळा किरण पाटील,रामजीनगर गोपाल चौधरी,दीपक बावस्कर , गजानन ताडे ,दिलीप इंगळे, गजानन मख नितेश गवादे यांचे सह शिक्षक मित्र परिवार उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांचा स्वागतपर सत्कार प्रशालेचे वतीने मुख्याध्यापक व शिक्षक यांनी केला.

याप्रसंगी बोलताना पुष्पाताई काळे यांनी विद्यार्थी व शिक्षक यांचे कौतुक करून अभिनंदन केले,व भविष्यात उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या ,शाळेच्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी शाळेचे पालकत्व स्वीकारून काम करणार आहोत असे आश्वासन दिले.यावेळी कृषी भूषण तथा शिक्षण प्रेमी अरुण सोहनी यांनी जिल्हा परिषद शाळा कशी जपली जाईल यावर मनोगत व्यक्त केले तसेच अनेक मान्यवरांची समायोचीत भाषणे पार पडली.सूत्र संचलन दौलतसिंग परदेशी आभार भास्कर चौधरी यांनी मानले.

कार्यक्रम यशस्विते साठी शाळेचे मुख्याध्यापक दादाराव राठोड यांच्या सह सर्व शिक्षक शिवाजी नवले,विद्याधर बागुल,राजेंद्र उंबरकर , संगीता सोनवणे,जया वाघ,तुकाराम पायघन,सचिन ढगे,शिवराम आगे,संतोष भारद्वाज,सागर पडघम,कर्मचारी प्रवीण चावळे यांनी परिश्रम घेतले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment