मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

छोटे पंढरपूर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमले; आषाढी एकादशी उत्साहात साजरी

On: July 26, 2026 5:24 PM
Follow Us:
---Advertisement---

 

 

छोटे पंढरपूर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमले; आषाढी एकादशी उत्साहात साजरी

 

पहाटेपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी; भजन

-कीर्तन, दिंड्या आणि महाप्रसादाचा लाभ

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी

 

छत्रपती संभाजीनगरातील छोटे पंढरपूर येथे आषाढी एकादशीचा पवित्र सोहळा मोठ्या भक्तिभाव, उत्साह आणि धार्मिक वातावरणात पार पडला. पहाटेच्या काकड आरतीपासूनच विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिर परिसर “विठ्ठल… विठ्ठल…” आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने दुमदुमून गेला.

 

यावेळी विठ्ठल-रुक्मिणीची अभिषेक पूजा, महापूजा, काकड आरती, हरिनाम सप्ताह, भजन-कीर्तन तसेच प्रवचनांचे आयोजन करण्यात आले. वारकरी दिंड्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या अखंड घोषात मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

 

दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांसह भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. मंदिर समिती आणि प्रशासनाच्या वतीने दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. संपूर्ण सोहळा शांततेत, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

 

आषाढी एकादशी निमित्ताने हजारो भाविकांनी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होत सुख, समृद्धी आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. छोटे पंढरपूर येथे साजरा झालेला हा भक्तिमय सोहळा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment