मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका क्रीडा स्पर्धांचे नियोजन

On: July 28, 2026 10:35 PM
Follow Us:
---Advertisement---

जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका क्रीडा स्पर्धांचे नियोजन

 

 

 

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

 सोयगाव / प्रतिनिधी यासीन बेग

 

 

 

 

 

सोयगाव, सोयगाव तालुका क्रीडा स्पर्धा २०२६–२०२७ च्या यशस्वी आयोजनासाठी नियोजन बैठक जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. मुकुंद वाडकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या बैठकीस संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, सोयगाव येथील प्राचार्य डॉ. शिरीष पवार व उपप्राचार्य डॉ. रावसाहेब बारोटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

बैठकीत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक, आयोजनाची रूपरेषा, स्पर्धा सुरळीत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक नियोजन तसेच विविध शाळा व महाविद्यालयांच्या जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

यावेळी तालुका क्रीडा संयोजक तथा क्रीडा विभाग प्रमुख डॉ. निलेश गाडेकर यांनी सन २०२६–२०२७ मधील तालुका क्रीडा स्पर्धांचे सविस्तर नियोजन उपस्थितांसमोर मांडले. त्यांनी स्पर्धा पारदर्शक, दर्जेदार व खेळाडूकेंद्रित पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या.

 

नुकतीच जिल्हा क्रीडा अधिकारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल श्री. मुकुंद वाडकर यांचा संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच क्रीडा अधिकारी श्री. यादव यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

 

याचप्रसंगी तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षकांच्या वतीने श्री. गोबरा राठोड यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. मुकुंद वाडकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

 

बैठकीस तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांचे क्रीडा शिक्षक, प्रतिनिधी व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी तालुक्यातील क्रीडा चळवळ अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment