मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

घरकुल दालनाला कुलूप, लाभार्थी दरवाजात पंचायत समितीतील बेजबाबदार कारभारामुळे गोरगरीब हैराण

On: July 30, 2026 10:35 AM
Follow Us:
---Advertisement---

घरकुल दालनाला कुलूप, लाभार्थी दरवाजात

पंचायत समितीतील बेजबाबदार कारभारामुळे गोरगरीब हैराण

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

जाफराबाद प्रतिनिधी : मोहम्मद बाईयाश

 

जाफ्राबाद पंचायत समितीच्या कार्यालयात घरकुल विभागाच्या दालनाला कुलुप बंद दरवाजा बघून लाभार्थ्यांना हेलपाटे बसत आहे..

 

गोरगरीबांना हक्काचे घर मिळवून देणाऱ्या घरकुल योजनेचे दालनच कुलूपबंद. लाभार्थी हप्त्यासाठी, माहितीसाठी दिवसभर चकरा मारत आहेत. पण पंचायत समितीतील संबंधित कर्मचारी मात्र कार्यालयात दिसत नाहीत. जाफ्राबाद पंचायत समितीतील हा बेजबाबदार कारभार सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

 

*दररोजची हीच अवस्था*

पंचायत समिती आवारातील घरकुल दालन गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लाभार्थी येतात. मात्र दालनाला कुलूप असल्याने त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.

 

जाफ्राबाद तालुक्यातील विविध गावांमधून 30-40 किलोमीटरचा प्रवास करून आले वृद्ध, महिला आणि मजूर तासनतास दालनासमोर बसून राहतात. अखेर कर्मचारी येणार नाही हे लक्षात आल्यावर निराशेने घरी परततात.

 

*हप्ते रखडले, बांधकाम अर्धवट*

अनेक लाभार्थ्यांच्या घरकुलाचे दुसरे आणि तिसरे हप्ते रखडले आहेत. पावसाळा तोंडावर आला आहे. अर्धवट घरात राहणे मुश्किल झाले आहे. वारंवार चकरा मारूनही काम होत नसल्याने लाभार्थी आक्रमक झाले आहेत.

 

“आम्ही मजुरी सोडून येतो. 200 रुपये खर्च करून येतो. पण इथे कोणीच नसते. आम्ही जायचे कुठे” असे संतप्त उद्गार एका लाभार्थी महिलेने काढले.

 

*जबाबदार कोण*

घरकुल योजना केंद्र आणि राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. पण त्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेचाच पत्ता नसल्याने या योजनेचा उद्देशच फोल ठरत आहे.

 

लाभार्थ्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तातडीने लक्ष घालून घरकुल दालनातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती शंभर टक्के करण्याची मागणी केली आहे. तसेच दररोजच्या उपस्थितीचा फलक दालनाबाहेर लावावा अशी मागणीही होत आहे.

 

सरकार घरे देते आहे. पण ती घरे मिळवून देणारी यंत्रणाच झोपली असेल तर गोरगरीबांचे स्वप्न पूर्ण होणार कसे, असा सवाल आता लाभार्थी विचारत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment