मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

सिग्मा हॉस्पिटलजवळ मोबाईल चोरी करणाऱ्या झारखंडच्या दोन आरोपींना जवाहरनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

On: August 24, 2026 9:52 PM
Follow Us:
---Advertisement---

सिग्मा हॉस्पिटलजवळ मोबाईल चोरी करणाऱ्या झारखंडच्या दोन आरोपींना जवाहरनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

 

दैनिक शब्दमत न्यूज नेटवर्क

 

छत्रपती संभाजीनगर, दि. २४ ऑगस्ट : सिग्मा हॉस्पिटलजवळील दर्गा रोड परिसरात भाजीपाला खरेदी करत असलेल्या व्यक्तीचे लक्ष विचलित करून मोबाईल चोरी करणाऱ्या झारखंड व बिहार राज्यातील दोन आरोपींना जवाहरनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून चोरीच्या मोबाईलसह एकूण ६५ हजार रुपये किमतीचे तीन महागडे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ७.४५ वाजता फिर्यादी राजेश रामराव सानप (वय ४६, व्यवसाय-कॉन्ट्रॅक्टर, रा. जयभवानीनगर, गल्ली नं. १२, छत्रपती संभाजीनगर) हे सिग्मा हॉस्पिटलजवळील दर्गा रोड परिसरात भाजीपाला खरेदी करत होते. यावेळी दोन इसमांनी त्यांना जाणूनबुजून धक्का देऊन त्यांचे लक्ष विचलित केले. त्यानंतर त्यांच्या खिशातील विवो कंपनीचा २४,९९९ रुपये किमतीचा मोबाईल चोरी करण्यात आला.

 

या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ३५८/२०२६, कलम ३०३(२), ३(५) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

 

गुन्हा दाखल होताच जवाहरनगर पोलीस ठाण्याचे बिट मार्शल पोलीस अंमलदार मारोती गोरे व राजू शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. गुप्त बातमीदाराच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू असताना दर्गा चौक परिसरात दोन इसम संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

 

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी दर्गा परिसरात सापळा रचून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांना पाहताच दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी काही अंतर पाठलाग करून त्यांना पकडले.

 

ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे शेख फय्याज शेख असलम (वय २१, रा. महाराजपूर, मोतीझरणा, तहसील तेलझरी, जि. साहेबगंज, झारखंड) आणि नकसुद इदवाह आलम (वय २०, रा. महचौक, ता. जि. कठियाल, बिहार) अशी आहेत.

 

पोलिसांनी चौकशी केली असता आरोपींकडे तीन महागडे मोबाईल आढळून आले. अधिक चौकशीदरम्यान त्यांनी सिग्मा हॉस्पिटलजवळ भाजीपाला खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या खिशातून मोबाईल चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

आरोपींकडून विवो कंपनीचा २४,९९९ रुपये किमतीचा मोबाईल, ओपो A3 कंपनीचा २० हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि पोको कंपनीचा २० हजार रुपये किमतीचा मोबाईल, असे एकूण ६५ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ रत्नाकर नवले, सहाय्यक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर आणि उस्मानपुरा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

गुन्ह्याचा तपास पोहेकॉ. १४३८ नवतुरे, पोलीस अंमलदार मारोती गोरे व राजू शिंदे यांनी केला. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून, पुढील तपास जवाहरनगर पोलीस करीत आहेत.

 

दैनिक शब्दमत — महाराष्ट्राचा बुलंद आवाज

सत्य | निर्भीड | निष्पक्ष

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment