बाहेर ये, तुझा काटा काढतो!
पोलीस ठाण्यातच तक्रारदार व्यापाऱ्याला मारहाण करीत धमकी
त्यांच्या दिशेने मारली.
छत्रपती संभाजीनगर :
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
जमिनीसंदर्भात अर्ज करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या तक्रारदाराला पाहून शिवीगाळ करणाऱ्याने तेथील वीटकर तक्रारदाराच्या डोक्यात घातली. तसेच पायावर बेदम मारहाण केली. धक्कादायक म्हणजे, तो तेवढ्यावरच थांबला नाही. बाहेर ये… तुझा काटाच काढतो अशी धमकीही दिली. एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात रविवारी (दि.२३) रोजी रात्री साडेसात वाजता हा प्रकार घडला.
संतोष बन्सी जाधव (रा. सिंधीबन) असे संशयित आरोपीचे नाव आहे. अंकुश अशोक दहिहंडे (३८, रा. राम मंदिराजवळ, चिकलठाणा) हे फिर्यादी आहेत. ते हॉटेल व्यवसाय करतात. जमिनीसंदर्भात तक्रार देण्यासाठी
२३ ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता ते एमआयडीसी सिडको ठाण्यात गेले होते. तेव्हा संतोष जाधव तेथे आला. त्याने लगेचच आरडाओरड करत शिवीगाळ सुरू केली. अंकुश दहिहंडे दिसताच त्याने तेथील वीटकर उचलून
पोलीस ठाण्यातच तक्रारदार व्यापाऱ्याला मारहाण करीत धमकी
त्यांच्या दिशेने मारली.
तसेच, ठाण्यात पडलेला एक दांडा उचलून त्यांच्या पायावर मारला. पोलिसांनी मध्यस्थी करून त्याला बाजूला केले. त्यानंतर हॉटेलमध्ये गांजा ठेवून तुला अडकवतो. बाहेर ये… तुझा काटा काढतो… अशा धमक्या त्याने त्यांना दिल्या.





