जिल्हास्तरीय वुशू व बॉक्सिंग स्पर्धेत मोहम्मद हमजा अझर शेख याचा प्रथम क्रमांक; सुवर्णपदकावर कोरले नाव
छत्रपती संभाजीनगर:
येथील एसएफएस इंग्लिश स्कूलचा इयत्ता ९ वी चा विद्यार्थी मोहम्मद हमजा अझर शेख याने जिल्हास्तरीय स्पर्धेत ३६ किलो वजन गटात उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून विजेतेपद मिळविले आहे.
१ ल्या छत्रपती संभाजीनगर सब-ज्युनिअर/ज्युनिअर वुशू स्पर्धेचे आयोजन टीव्ही सेंटर रोडवरील राणा मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार सुहास शिरसाठ यांच्या हस्ते पार पडले.
स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या मोहम्मद हमजा अझर शेख याला ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे अध्यक्ष मुख्तार पटेल व सचिव सय्यद सद्दाम यांच्या हस्ते सुवर्णपदक (गोल्ड मेडल) व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
मोहम्मद हमजा याला या यशासाठी क्रीडा शिक्षक सय्यद जुबेर सर आणि अब्दुल हादी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मोहम्मद हमजा हा ‘दैनिक शब्दमत’चे बातमीदार शेख आझर सर यांचा सुपुत्र आहे.
या प्रसंगी माजी नगरसेवक इर्शाद हाजी, नासेर सिद्दीकी, शेख सलमान पैलवान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी जहूर सय्यद, अजिंक्य नितनवारे, जाहिद खान, अब्दुल हादी, अब्दुल मजीद, सय्यद जुबेर, सय्यद रिजवान, सय्यद अबुलाला, क्रीडा टीम व आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले.
मोहम्मद हमजा अझर शेख याच्या या उल्लेखनीय यशोशिखराबद्दल शाळा प्रशासन, शिक्षक, कुटुंबीय व शुभचिंतकांनी त्याचे कौतुक करून पुढील क्रीडा प्रवासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.





