मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

भाजप व एम आय एम चे नगरसेवकान मध्य जुंपली

On: August 30, 2026 9:34 PM
Follow Us:
---Advertisement---

♦एमआयएम नेते युनुस पटेल यांनी आरोप फेटाळले म्हणाले मी मतीन नाही…!

 

एमआयएम नेते युनुस पटेल यांनी आरोप फेटाळले; म्हणाले, “मी मतीन नाही!”

 

पोल शिफ्टिंगच्या कामावरून वाद; राजगौरव वानखेडे यांच्यावर पलटवार

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर प्रभाग क्रमांक 1 मधील जटवाडा रोड परिसरात सुरू असलेल्या पोल शिफ्टिंगच्या कामावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हर्मुल येथील एमआयएमचे नेते युनुस पटेल यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. पोल शिफ्टिंगचे काम बंद पाडण्यासाठी आपण अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना कोणतीही दमदाटी केली नसल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले.

 

नगरसेवक राजगौरव वानखेडे हे आपल्यावर बिनबुडाचे आरोप करत असून, विकासकामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप करून आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात असल्याचे पटेल यांनी सांगितले.

 

युनुस पटेल म्हणाले की, “मी पोल शिफ्टिंगचे काम रोखले नाही. कामगारांकडे सेफ्टी बेल्ट आहे का, डोक्याच्या सुरक्षेसाठी हेल्मेट आहे का, तसेच त्यांचा विमा काढण्यात आला आहे का, एवढीच विचारणा ठेकेदाराकडे केली. पोलवर काम करताना एखाद्या कामगाराचा अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोणाची, तसेच कामाचे इस्टिमेट आहे का, अशीही विचारणा केली. अधिकारी-कर्मचाऱ्यांना काम बंद करण्यासाठी कोणतीही दमदाटी केली नाही,” असा दावा त्यांनी केला.

 

2 कोटी 25 लाखांच्या कामाचे टेंडर

 

 

 

पटेल यांनी पुढे सांगितले की, आपण आणि प्रभागातील चारही नगरसे फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या वीज विभागाच्या कार्यकारी अभियंत्या निवेदन देऊन पोल शिफ्टिंगचे काम सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सुमारे 2 कोटी 25 लाख रुपयांच्या कामाचे टेंडर काढण्यात अ आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते तसेच प्रभागातील नगरसेवकांच्या

 

2 कोटी 25 लाखांच्या कामाचे टेंडर

 

पटेल यांनी पुढे सांगितले की, आपण आणि प्रभागातील चारही नगरसेवकांनी 2 फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या वीज विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन पोल शिफ्टिंगचे काम सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सुमारे 2 कोटी 25 लाख रुपयांच्या कामाचे टेंडर काढण्यात आले. आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते तसेच प्रभागातील नगरसेवकांच्या उपस्थितीत पोल शिफ्टिंगच्या कामाचा शुभारंभ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 

“प्रभागात पालकमंत्री, आमदार, खासदार तसेच महापालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू आहेत. आम्ही प्रभागाच्या विकासासाठी काम करत आहोत. मग विकासकामात आम्ही अडथळा कधी आणला, हे राजगौरव वानखेडे यांनी सांगावे,” असेही पटेल म्हणाले.

 

“वानखेडेंवरही कारवाई करावी”

 

या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे आणि आरोप करणाऱ्या राजगौरव वानखेडे यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी पटेल यांनी केली.

 

“वानखेडे यांनी त्यांच्या प्रभागातील विकासकामांकडे लक्ष द्यावे. आमच्या प्रभागात हस्तक्षेप करू नये. मी मतीन नाही,” असा टोला पटेल यांनी लगावला.

 

महापौर आणि उपमहापौर यांच्याशी आपले चांगले संबंध असल्याचे सांगत पटेल म्हणाले की, “माझी काही चूक असेल तर चौकशी करून माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करायचा किंवा नाही, याचा निर्णय संबंधित अधिकारी घे

 

नगरसेवक अशोक हिवराळे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत युनुस पटेल यांनी हे स्पष्टीकरण दिले. यावेळी नगरसेवक अझर पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment