मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

त्रिमुर्ती चौकात धारदार कोयत्याने वार करणा-र्या आरोपीला जवाहरनगर पोलीसांनी ठोकल्या बेड्या…”

On: September 2, 2026 9:25 PM
Follow Us:
---Advertisement---

 

 

“ त्रिमुर्ती चौकात धारदार कोयत्याने वार करणा-र्या आरोपीला जवाहरनगर पोलीसांनी ठोकल्या बेड्या…”

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

धारदार कोयत्याने जिवे मारण्याच्या उद्देशाने वार करणा-र्या आरोपीच्या मोठ्या शिताफीने जवाहरनगर पोलीसांनी आवळल्या मुसक्या..

 

दिनांक-25/08/2026 रोजी रात्री वेळ-09.15 वाजे सुमारास फिर्यादी अरुण उत्तम जोगदंडे वय-39 वर्षे धंदा खाजगी नौकरी रा-बौध्दनगर जवाहर कॉलनी छत्रपती संभाजीनगर. हे जेवण करुन त्रिमुर्ती चौक येथे त्यांचा मित्र नामे अरुण काथार याचे राखीचे हातगाडीवर बोलत असतांना अंदाजे रात्री 10.00 वाजेच्या सुमारास अचानक फिर्यादीच्या पाठिमागे कोणीतरी आल्याचे जानवले, त्यामुळे फिर्यादीने मागे वळून पाहिले असता, त्रिमुर्ती चौकात नेहमी फिरत असलेला रोहन गवळीच्या हातामध्ये कोयता दिसला. काही कारण नसतांना रोहन गवळीने त्याचे हातातील धारदार कोयत्याने जिव घेण्याच्या उद्देशाने प्रथम फिर्यादीच्या मानेवर डाव्या बाजुने वार केला. तो फिर्यादीने हाताने अडविल्याने दोन्ही हाताला मोठी गंभीर जखम झाली. फिर्यादीवर झालेला अचानक हल्यामुळे फिर्यादी घाबरले, धारदार कोयत्याचे होणारे वार फिर्यादीच्या डाव्या हातावर व उजव्या हातावर लागले. दोन्ही हाताला मोठी गंभीर जखम झाली. त्यावेळी तात्काळ फिर्यादीस महेंद्र खरात यांनी जवळच्या हेडगेवार हॉस्पीटल येथे दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी प्रथमउपचार केले व तेथुन फिर्यादीस ESI हॉस्पीटल येथे दाखल केले. फिर्यादीच्या MLC जबाबावरुन पोलीस स्टेशन जवाहरनगर गुरनं-376/2026 कलम-109(1) BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास सपोनि / श्री. लोहकरे करित आहेत.

 

सदर घटणेचे गांभीर्य लक्षात घेत मा. वरिष्ठांच्या आदेशाने व मार्गदर्शनात सदर आरोपीचा शोध घेत असतांना दिनांक-29/08/2026 रोजी मध्यरात्री अंदाजे 02.00 वाजे सुमारास पोलीस अंमलदार मारोती गोरे, राजेंद्र शिंदे यांना गुप्तबातमीदाराच्या मार्फतीने माहीती मिळाली की, त्रिमुर्ती चौकात कोयत्याने वार करणारा आरोपी रोहण गवळी हा शांती निकेतन कॉलनी परिसरात एका कार पार्कींगमध्ये झोपलेला आहे. त्यावरुन आम्ही तात्काळ सदरची माहीती मा. पोलीस निरीक्षक सचिन कुंभार साहेबांना दिली. वरिष्ठांच्या आदेशाने व मार्गदर्शनात डिओ अधिकारी पोउपनि रावसाहेब वाघ पोअं / मारोती गोरे, पोअं/राजेंद्र शिंदे असे मिळालेल्या माहीतीवरुन तात्काळ सदर ठिकाणी गेलो असता सदर आरोपी रोहन गवळी अंधारामध्ये कार पार्कीगमध्ये दिसुन आला, आम्ही त्याला ताब्यात घेतले. त्याला त्याचे नाव गाव विचारले असता, त्याने त्याचे नाव रोहन दुर्गादास गवळी वय-33 वर्षे, धंदा मजुरी, मुळ गाव रा. मेसखेडा ता. मंठा, जि. जालना, सध्या रा. शांतीनिकेतन कॉलनी छत्रपती संभाजीनगर. त्याला अधिक विश्वासात घेवुन सदरच्या घटणेबाबत विचारपुस केली असता, त्याने फिर्यादी अरुण जोगदंडे यास कोयत्याने मारहाण केल्याची कबुली दिली. त्याबाबतची माहीती मा. वरिष्ठांना देवुन दिली.

 

पोलीस स्टेशन जवाहरनगर गुरनं-376/2026 कलम-109 (1) BNS प्रमाणे गंभिर स्वरुपाच्या गुन्ह्यातील आरोपीस ताब्यात घेतले. सदरचा गुन्हा उघडकीस आणला.

 

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. प्रवीण पवार साहेब, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-02 श्री. रत्नाकर नवले साहेब, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. मनिष कल्याणकर साहेब, उस्मानपुरा विभाग, वरिष्ट पोलीस निरीक्षक श्री. सचिन कुंभार साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि रावसाहेब वाघ पोअं/ मारोती गोरे, पोअं/राजेंद्र शिंदे यांनी उत्कृष्ट कामगीरी केली आहे…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment