मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत प्लॉटिंगवर मनपाचा सर्जिकल स्ट्राईक; ४५० एकरांमधील ३२ गटांचे खरेदी-विक्री व्यवहार ठप्प

On: September 4, 2026 11:10 AM
Follow Us:
---Advertisement---

छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत प्लॉटिंगवर मनपाचा सर्जिकल स्ट्राईक; ४५० एकरांमधील ३२ गटांचे खरेदी-विक्री व्यवहार ठप्प

मनपाच्या परवानगीशिवाय रजिस्ट्री व फेरफार न करण्याचे आयुक्तांचे आदेश; ६ हजारांपेक्षा जास्त बेकायदा प्लॉटवर फिरला जेसीबी

विशेष प्रतिनिधी | दैनिक शब्दमत

छत्रपती संभाजीनगर:

शहरात अनधिकृत प्लॉटिंगचा सपाटा लावून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या भूमाफियांविरोधात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने आक्रमक मोहीम उघडली आहे. शहरालगतच्या ३२ गटांमधील तब्बल ४५० एकर जमिनींवर पाडलेले ६ हजारांपेक्षा जास्त बेकायदा प्लॉट मनपाच्या पथकाने उद्ध्वस्त केले आहेत. या सर्व ३२ गटांचे सातबारे (७/१२) लॉक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, मनपाच्या अधिकृत लेआऊट मंजुरीशिवाय कोणत्याही रजिस्ट्री किंवा फेरफार (म्युटेशन) नोंदी करू नयेत, असे स्पष्ट निर्देश मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिले आहेत.

महसूल आणि नोंदणी विभागाची संयुक्त बैठक

या कारवाईला प्रशासकीय बळ देण्यासाठी मनपा, महसूल आणि रजिस्ट्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, मनपा अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे, तहसीलदार डॉ. शिवानंद विडवे यांच्यासह उपनिबंधक उपस्थित होते. मनपाकडून कारवाई झालेल्या ३२ गटांची सविस्तर यादी महसूल विभागाला सोपवण्यात येत आहे. या आर्थिक नाकेबंदीमुळे शहरातील भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. प्रभारी नोंदणी अधिकारी संदीप आहेर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय नियमांचे व मनपाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करूनच पुढील रजिस्ट्रीची प्रक्रिया पार पाडली जाईल.

कारवाईचा बडगा उगारलेले प्रमुख परिसर व गट क्रमांक:

* देवळाई व चिकलठाणा: गट क्र. ५३, ५४, ५५, ५६

* पहाडसिंगपुरा व मिटमिटा: गट क्र. ९८/२, ११०, १११, ११२, ११३, ११८, १२४, १५६, १५८, १७८, १७९

* हनुमान टेकडी व पहाडसिंगपुरा: गट क्र. ४०, ४०/१, ४२, ४२/३, ४५, ४५/१, ४९

* हसूल व हिमायतनगर: गट क्र. १५, ६१, २३३, २३४, २३७, २७५, २७९

अधिकारी बनले ग्राहक; जागेवरच फिरवला जेसीबी!

मिटमिटा परिसरातील १५ एकर यलो झोनच्या जागेवर अनधिकृत प्लॉटिंग पाडून विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच मनपाचे अधिकारी संतोष वाहुळे यांनी रणनीती आखली. त्यांनी स्वतः ग्राहक बनून विक्रेत्याशी संपर्क साधला आणि जमिनीची माहिती काढली. बुधवारी प्रत्यक्ष प्लॉट पाहण्याच्या बहाण्याने वाहुळे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाड टाकली. तेथे गट क्र. १७८ (७ एकर) आणि गट क्र. १७९ (५ एकर ८ गुंठे) मध्ये अस्लम खान व अजमत खान यांनी ५०० हून अधिक बोगस प्लॉट पाडून सिमेंटचे पोल रोवले होते. मनपाच्या पथकाने कोणतीही सवड न देता थेट जेसीबी चालवून संपूर्ण अनधिकृत बांधकाम जमिनीदोस्त केले. याप्रकरणी जमीन मालक व भूमाफियांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विश्लेषण: अधिकृत परवानग्या टाळून नफ्याचा खेळ

नियमनियमांनुसार लेआऊट मंजूर करून घेण्यासाठी रस्ते, नाले, ओपन स्पेस आणि गार्डनसाठी २५ टक्क्यांहून अधिक जागा सोडावी लागते. याशिवाय मूलभूत सुविधा पुरवण्याचा खर्च येतो. हा खर्च आणि जागा वाचवण्यासाठी भूमाफिया स्थानिक प्रशासकीय त्रुटींचा फायदा घेत ६०० ते १००० स्क्वेअर फुटांचे छोटे प्लॉट पाडतात. सर्वसामान्यांना स्वस्त प्लॉटचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा नफा लाटला जातो. मात्र, आता मनपाच्या या धडक कारवाईमुळे बेकायदा प्लॉटिंगच्या बाजाराला मोठा

लगाम बसणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment