मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

On: September 4, 2026 3:44 PM
Follow Us:
---Advertisement---

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

औरंगाबाद (विशेष प्रतिनिधी): दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

शहरातील गारखेडा परिसरात आज सायंकाळच्या सुमारास एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर काही अज्ञात इसमांनी भ्याड हल्ला केला. या अचानक झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे गारखेडा परिसरात आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अजहर पठान हे गारखेडा भागातून जात असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना गाठले आणि त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहेत.

अब्दुल हसन हाशमी यांचे कडक कारवाईचे मागणी पत्र

या भ्याड हल्ल्याचा इस्लाम पार्टीचे युवा शहर अध्यक्ष अब्दुल हसन हाशमी यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. एक मोठा व्हिडिओ संदेश जारी करत हाशमी म्हणाले, “अजहर पठान यांच्यावर झालेला हा हल्ला अतिशय भ्याडपणाचा आहे. शहरातील शांतता बिघडवण्याचा हा प्रयत्न असून प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी. हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल.”

या घटनेनंतर पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने एकत्र आले असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस प्रशासन नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन कर

त आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

दुय्यम  निबंधक कार्यालयात -२ वीज नसल्याने दस्त नोंदणी ठप्प; नागरिकांचे हाल चिकलठाणा कार्यालयात इन्व्हर्टरचा अभाव; ‘शब्दमत’ विशेष वृत्त

Leave a Comment