मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

करपलेल्या शेतपिकांची अंबादास दानवेंकडून पाहणी; कर्नाटकच्या धर्तीवर तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी

On: September 22, 2026 7:27 PM
Follow Us:
---Advertisement---

 

  1. करपलेल्या शेतपिकांची अंबादास दानवेंकडून पाहणी; कर्नाटकच्या धर्तीवर तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी

वैजापूर / कन्नड (विशेष प्रतिनिधी): दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

पावसाने मारलेल्या प्रदीर्घ ओढीमुळे करपून गेलेल्या शेतपिकांची शिवसेना नेते, आमदार तथा माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवार, २२ सप्टेंबर रोजी वैजापूर व कन्नड तालुक्यांतील विविध गावांमध्ये प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. खंडाळा, शिऊर आणि कानडगाव येथे भेट देऊन त्यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि पिकांच्या झालेल्या अतोनात नुकसानीचा आढावा घेतला.

पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्यामुळे शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत महाराष्ट्र शासनाने केवळ पाहणी आणि पंचनाम्यांचे सोपस्कार न करता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने प्रत्यक्ष मदत जाहीर करावी, अशी आक्रमक मागणी अंबादास दानवे यांनी केली. तसेच कर्नाटक सरकारच्या धर्तीवर राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही भरीव आणि ठोस नुकसानभरपाई देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

शेताच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केल्यानंतर आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर दानवे म्हणाले, “शेतकरी आज प्रचंड आर्थिक अडचणीत आहे. शासनाने आता विलंब न करता तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधून बाधित शेतकऱ्यांना लवकर मदत मिळवून देण्यासाठी आपण सतत पाठपुरावा करू.”

या पाहणी दौऱ्याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख बबन जाधव, तालुकाप्रमुख संजय मोटे, जिल्हा परिषद सदस्य संजय निकम, कल्याण चव्हाण, रमेश सावंत, विठ्ठल डमाळे, चांगदेव सावडे आणि भिकन सोमासे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थि

त होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मुकुंदवाडीत नागरिकाच्या सतर्कतेमुळे घरफोडीचा प्रयत्न उधळला; गारखेड्यात वृद्धेला लाथ मारून लुटण्याचा प्रयत्न करणारा अल्पवयीनही पकडला

सिडको पोलिसांची मोठी कारवाई; ६ जणांच्या जेրात्मक मुसक्या आवळत ४ पिस्तुले व ११ जीवंत काडतुसे जप्त! छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):

मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपमुळे महायुतीत मोठा भडका; भाजप-शिवसेना आमनेसामने

दुष्काळसदृश परिस्थितीमुळे १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; AIMIM ची विभागीय आयुक्तांकडे मागणी

दहा लाखांची खंडणी दे, अन्यथा जीवे मारू!’ मा. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना धमकी; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ पुंडलिकनगर पोलीस ठाण्याबाहेर समर्थकांचा मध्यरात्रीपर्यंत ठिय्या; दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी

नागपूर पदवीधर मतदारसंघ: एकाच नंबरवरून तब्बल २२ हजार मतदारांची नोंदणी; काँग्रेसचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

Leave a Comment