मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

मुख्य निवडणूक आयुक्तांना तात्काळ हटवा, सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करा: अभिषेक बॅनर्जी यांची मागणी

On: September 23, 2026 8:39 PM
Follow Us:
---Advertisement---

 

मुख्य निवडणूक आयुक्तांना तात्काळ हटवा, सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करा: अभिषेक बॅनर्जी यांची मागणी

  1. कोलकाता: दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

तृणमूल काँग्रेसचे नेते आणि डायमंड हार्बरचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांना त्यांच्या पदावरून तात्काळ हटवण्याची आणि निवडणूक आयोगाच्या कामकाजाची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची जोरदार मागणी बुधवारी केली आहे.

मतदारसूची दुरुस्तीशी (SIR) संबंधित निर्णयांवर इतर दोन निवडणूक आयुक्तांनी – सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी – गेल्या १० महिन्यांत सुमारे १४ वेळा औपचारिक आक्षेप नोंदवल्याची बातमी एका राष्ट्रीय दैनिकात प्रसिद्ध झाली होती. या मीडिया रिपोर्टचा हवाला देत अभिषेक बॅनर्जी यांनी ही मागणी लावून धरली आहे. हे निर्णय दोन्ही निवडणूक आयुक्तांना अंधारात ठेवून घेण्यात आल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

‘लोकशाहीच्या पायावर आघात’

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करताना बॅनर्जी म्हणाले, “मुख्य निवडणूक आयुक्तांना तात्काळ पदावरून हटवून संपूर्ण प्रकरणाची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी झाली पाहिजे. एका विशिष्ट राजकीय पक्षाला फायदा पोहोचवण्यासाठी लाखो मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणे हा आपल्या लोकशाहीच्या पायावर केलेला मोठा आघात आहे. यासाठी जबाबदार असणाऱ्यांची उत्तरदायित्व निश्चित केले पाहिजे.”

न्यायालयीन चौकशीची मागणी

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचीही न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी खासदार बॅनर्जी यांनी केली. निवडणुकीनंतर ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी भारताचे सरन्यायाधीश (CJI) आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पत्र लिहून गंभीर चिंता व्यक्त केली होती.

बॅनर्जी पुढे म्हणाले, “या आरोपांची कोणतीही चौकशी झाली नाही आणि त्यांना योग्य ते गांभीर्य दिले गेले नाही. जेव्हा लोकशाही प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले जातात आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाते, तेव्हा संस्थांच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. सर्वोच्च न्यायालय या गंभीर मुद्द्यावरून आपले तोंड फिरवू शकत नाही, अंतिम जबाबदारी न्यायालयाचीच आहे. सरन्यायाधीशांचे खंडपीठ यावर योग्य ती कारवाई करेल का?” असा सवालही त्यांनी शेवटी उपस्थि

♦त केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

आता मोबाईलवरूनच करा शेतजमिनीची मोजणी; ‘GPS Area Calculator’ अ‍ॅपमुळे शेतकऱ्यांचा वेळ अन् पैशांची बचत!

राजस्थानमध्ये खळबळ: स्टोन क्रशरच्या वादातून भाजपचे माजी आमदार अतार सिंग भडाना यांची निर्घृण हत्या भरतपूर:

तेलंगणात निलंबित DSP भीम रेड्डी प्रकरणात एसीबीची मोठी कारवाई छापेमारीत १.३५ कोटींची रोकड, विदेशी चलन व दारू जप्त; यापूर्वी ३०० कोटींच्या मालमत्तेचा तपास

बंगालच्या उपसागरात घोंगावतेय चक्रीवादळ; आंध्र, ओडिशासह अनेक राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा

कोण आहे कोल थॉमस अॅलन ? ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा ‘नासा’शी काय संबंध?

तरुणाकडून वृद्ध आईवर बलात्कार, आधी बेदम मारहाण, नंतर हात-पाय बांधून रात्रभर अत्याचार

Leave a Comment