मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

फायनान्सच्या ६८ हजारांसाठी लुटीचा बनाव; दोघे गंगापूर पोलिसांच्या जाळ्यात

On: September 23, 2026 8:48 PM
Follow Us:
---Advertisement---

 

फायनान्सच्या ६८ हजारांसाठी लुटीचा बनाव; दोघे गंगापूर पोलिसांच्या जाळ्यात

गंगापूर: दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

फायनान्स कंपनीचे वसुलीचे ६८ हजार ५६ रुपये अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची कहाणी, अंगावर चाकूने वार, तोंडात कापड आणि हात-पाय दोरीने बांधल्याचा बनाव रचणाऱ्या फिल्ड असिस्टंटचा गंगापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्वतःच्या मित्राच्या मदतीने रचलेला हा जबरी चोरीचा बनाव पोलिसांच्या चाणाक्ष तपासामुळे उघडीस आला असून या प्रकरणात दोघांसह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे घटना?

‘भारत फायनान्शियल इन्क्लुजन लि.’ (शाखा गंगापूर) येथे किरण पंढरीनाथ वैरागर (रा. पानसलाना, शनिशिंगणापूर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर, ह.मु. गंगापूर) हा मागील ८ ते ९ महिन्यांपासून फिल्ड असिस्टंट म्हणून कार्यरत होता. तालुक्यातील महिला सदस्यांना कर्ज वाटप व हप्ते वसुलीची जबाबदारी त्याच्यावर होती. २१ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी लासूर रोडकडून गंगापूरकडे येत असताना शिंदेवाडी फाट्याजवळील आयडीएल इंग्लिश स्कूल परिसरात दोन मोटारसायकलींवरून आलेल्या ४ जणांनी चाकूचा धाक दाखवून ६८ हजार ५६ रुपये व मोबाईल लुटल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.

जबाबातील विसंगतीने संशय बळावला

घटना प्रथमदर्शनी गंभीर वाटत असल्याने गंगापूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला. मात्र, तक्रारदार किरण वैरागर याच्या जबाबातील विसंगती आणि विचारलेल्या प्रश्नांवरील त्याचा गोंधळ यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने संपूर्ण कटाची कबुली दिली.

असा रचला लुटीचा बनाव

किरणचा मित्र रवि ज्ञानदेव दरंदले (रा. शनिशिंगणापूर) याने पैशांच्या अडचणीमुळे किरणला फोन करून वसुलीचे पैसे लुटल्याचा बनाव करण्याचा प्लॅन आखला होता. २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी किरण, रवि दरंदले आणि त्याचा एक विधिसंघर्षग्रस्त बालक मित्र शिंदेवाडी फाट्याजवळील शेतात एकत्र आले. तिथे रवि आणि त्याच्या साथीदाराने किरणचे हात-पाय दोरीने बांधले आणि वसुलीची रोकड व मोबाईल घेऊन निघून गेले. त्यानंतर किरणने अज्ञात चोरट्यांनी लुटल्याचा बनाव रचला.

गुन्हा दाखल

कंपनीची आर्थिक फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी किरण पंढरीनाथ वैरागर, रवि ज्ञानदेव दरंदले आणि विधिसंघर्षबालक यांच्याविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३१६(२), ३१६(४), ६१(२) व २१७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी, सहाय्यक पोलीस अधीक्षक (गंगापूर उपविभाग) जान्हवी शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सलीम अमर चाऊस, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक पाटील, पोलीस उपनिरीक्षक विश्वजीत फरतडे, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर नरोडे, प्रकाश सातपुते, अजित नागलोत आणि होमगार्ड शरद पाटील व विश्वनाथ दारुंटे यांच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास गंगापूर पोली

स करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मुकुंदवाडीत नागरिकाच्या सतर्कतेमुळे घरफोडीचा प्रयत्न उधळला; गारखेड्यात वृद्धेला लाथ मारून लुटण्याचा प्रयत्न करणारा अल्पवयीनही पकडला

सिडको पोलिसांची मोठी कारवाई; ६ जणांच्या जेրात्मक मुसक्या आवळत ४ पिस्तुले व ११ जीवंत काडतुसे जप्त! छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):

मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपमुळे महायुतीत मोठा भडका; भाजप-शिवसेना आमनेसामने

दुष्काळसदृश परिस्थितीमुळे १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; AIMIM ची विभागीय आयुक्तांकडे मागणी

दहा लाखांची खंडणी दे, अन्यथा जीवे मारू!’ मा. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना धमकी; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ पुंडलिकनगर पोलीस ठाण्याबाहेर समर्थकांचा मध्यरात्रीपर्यंत ठिय्या; दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी

नागपूर पदवीधर मतदारसंघ: एकाच नंबरवरून तब्बल २२ हजार मतदारांची नोंदणी; काँग्रेसचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

Leave a Comment