मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

शेतीच्या हद्दीचा वाद सोडवण्यासाठी १ हजारांची लाच; तलाठी एसीबीच्या जाळ्यात पैठण तहसील कार्यालय परिसरातील कारवाई; शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर सापळा रचून अटक

On: September 26, 2026 12:58 PM
Follow Us:
---Advertisement---

शेतीच्या हद्दीचा वाद सोडवण्यासाठी १ हजारांची लाच; तलाठी एसीबीच्या जाळ्यात

 

  1. पैठण तहसील कार्यालय परिसरातील कारवाई; शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर सापळा रचून अटक

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

पैठण : शेतीच्या हद्दीचा वाद आणि संबंधित महसूल कागदपत्रांचे काम करून देण्यासाठी १ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या तक्रारीवरून पैठण तालुक्यातील वडवळी सज्जाचे तलाठी दिलीप कांबळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडल्याची कारवाई शुक्रवारी दुपारी पैठण तहसील कार्यालय परिसरात करण्यात आली.

 

वडवळी येथील एका ५० वर्षीय शेतकऱ्याचा शेजारील शेतकऱ्यांसोबत बांध व जमिनीच्या हद्दीवरून वाद सुरू होता. या प्रकरणी ७/१२ उतारा, फेरफार तसेच स्थळ पाहणीचा अहवाल मिळविण्यासाठी संबंधित शेतकरी तलाठी दिलीप कांबळे यांच्याकडे गेला होता. मात्र, काम करून देण्यासाठी कांबळे यांनी १ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला.

 

लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित शेतकऱ्याने छत्रपती संभाजीनगर येथील ACB कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ACB पथकाने पैठण तहसील कार्यालय परिसरात सापळा रचला.

 

तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच ACBच्या पथकाने तलाठी दिलीप कांबळे यांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. पंचांसमक्ष तसेच रासायनिक प्रक्रियेच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.

 

या कारवाईनंतर पैठण तहसील कार्यालय परिसरात खळबळ उडाली. कांबळे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ मधील कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. पुढील तपास ACBचे अधिकारी करीत आहेत.

 

लाच मागितल्यास ACBशी संपर्क साधा

 

शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कोणत्याही कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी घाबरू नये. महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करता येते.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मुकुंदवाडीत नागरिकाच्या सतर्कतेमुळे घरफोडीचा प्रयत्न उधळला; गारखेड्यात वृद्धेला लाथ मारून लुटण्याचा प्रयत्न करणारा अल्पवयीनही पकडला

सिडको पोलिसांची मोठी कारवाई; ६ जणांच्या जेրात्मक मुसक्या आवळत ४ पिस्तुले व ११ जीवंत काडतुसे जप्त! छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):

मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपमुळे महायुतीत मोठा भडका; भाजप-शिवसेना आमनेसामने

दुष्काळसदृश परिस्थितीमुळे १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; AIMIM ची विभागीय आयुक्तांकडे मागणी

दहा लाखांची खंडणी दे, अन्यथा जीवे मारू!’ मा. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना धमकी; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ पुंडलिकनगर पोलीस ठाण्याबाहेर समर्थकांचा मध्यरात्रीपर्यंत ठिय्या; दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी

नागपूर पदवीधर मतदारसंघ: एकाच नंबरवरून तब्बल २२ हजार मतदारांची नोंदणी; काँग्रेसचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

Leave a Comment