मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

अल्पवयीन मुलीची मानवी तस्करी व देहविक्री प्रकरण: दोन महिलांसह चौघांना १० वर्षे सक्तमजुरी * विशेष पोक्सो न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल * एकाची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता; एक महिला आरोपी अद्याप फरार

On: September 27, 2026 8:03 PM
Follow Us:
---Advertisement---

अल्पवयीन मुलीची मानवी तस्करी व देहविक्री प्रकरण: दोन महिलांसह चौघांना १० वर्षे सक्तमजुरी
विशेष पोक्सो न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
एकाची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता; एक महिला आरोपी अद्याप फरार
छत्रपती संभाजीनगर (विशेष प्रतिनिधी): दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
नोकरीचे आमिष दाखवून बांगलादेशातून बेकायदेशीरपणे भारतात आणलेल्या एका अल्पवयीन मुलीला डांबून ठेवून तिच्याकडून जबरदस्तीने देहविक्री करून घेणाऱ्या दोन महिलांसह चार आरोपींना विशेष पोक्सो न्यायालयाने प्रत्येकी १० वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश स्वप्निता महाले यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. तर पुराव्याअभावी एका वैद्यकीय व्यावसायिकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
दोषी ठरलेले आरोपी:
विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार सईद मेहतब शाह उर्फ शेख, वाजिद इलियास शेख, समीना सईद शाह उर्फ शेख (तिघे रा. हर्सूल, छत्रपती संभाजीनगर) आणि आशा हसन शेख (रा. बुधवार पेठ, पुणे) अशी १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर वैद्यकीय व्यावसायिक प्रशांत प्रत्युष रॉय (रा. सासवड, पुणे) यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. राणी नावाची या प्रकरणातील एक महिला आरोपी अद्याप फरार आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी व घटनाक्रम:
नोव्हेंबर २०२३ मध्ये अल्पवयीन पीडित मुलीला बांगलादेशातून चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून दलालांमार्फत अवैध मार्गाने भारतात आणण्यात आले होते. कोलकात्याहून तिला आधी पुण्यात आणले गेले. तेथे आशा शेख हिच्या ताब्यात तिला देण्यात आले. आशाने “तुला ५ लाख रुपयांत विकत घेतले आहे,” असे सांगून मुलीकडून बळजबरीने देहविक्री करून घेतली.
यानंतर जानेवारी २०२४ मध्ये फरार आरोपी राणी हिने या मुलीला छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल परिसरात आणून समीना व सईद शाह यांच्या घरी सोडले. तेथे समीना, तिचा पती सईद आणि वाजिद यांनी तिला डांबून ठेवून पुन्हा तिच्याकडून जबरदस्तीने देहविक्री करून घेतली.
फेसबुक मेसेंजरमुळे फुटला वाचा:
अत्यंत बिकट परिस्थितीत अडकलेल्या या मुलीने कौशल्याने फेसबुक मेसेंजरद्वारे बांगलादेशातील आपल्या वडिलांशी संपर्क साधला आणि संपूर्ण आपबिती सांगितली. तिच्या वडिलांनी तात्काळ बांगलादेश पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर बांगलादेश पोलिसांनी भारतीय पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच जानेवारी २०२४ मध्ये हर्सूल पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तातडीने धाड टाकत या अल्पवयीन मुलीची सुटका केली.
न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण:
सुनावणीदरम्यान विशेष पोक्सो न्यायालयाने मानवी तस्करीवर महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. मानवी तस्करीला बळी पडलेली व्यक्ती ही पीडित असते. त्यामुळे तिच्यावर बेकायदेशीर प्रवेशाचा (अवैध घुसखोरी) खटला चालवता येणार नाही. तिचे सन्मानाने पुनर्वसन करून तिला तिच्या मायदेशी (बांगलादेश) सन्मानाने रवाना केले जावे, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मुकुंदवाडीत नागरिकाच्या सतर्कतेमुळे घरफोडीचा प्रयत्न उधळला; गारखेड्यात वृद्धेला लाथ मारून लुटण्याचा प्रयत्न करणारा अल्पवयीनही पकडला

सिडको पोलिसांची मोठी कारवाई; ६ जणांच्या जेրात्मक मुसक्या आवळत ४ पिस्तुले व ११ जीवंत काडतुसे जप्त! छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):

मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपमुळे महायुतीत मोठा भडका; भाजप-शिवसेना आमनेसामने

दुष्काळसदृश परिस्थितीमुळे १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; AIMIM ची विभागीय आयुक्तांकडे मागणी

दहा लाखांची खंडणी दे, अन्यथा जीवे मारू!’ मा. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना धमकी; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ पुंडलिकनगर पोलीस ठाण्याबाहेर समर्थकांचा मध्यरात्रीपर्यंत ठिय्या; दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी

नागपूर पदवीधर मतदारसंघ: एकाच नंबरवरून तब्बल २२ हजार मतदारांची नोंदणी; काँग्रेसचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

Leave a Comment