मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

१२ कोटींच्या कमिशनसाठी कंत्राटदाराच्या कार्यालयासमोर दरोडा चिकलठाणा एमआयडीसीतील थरार; सव्वा तीन लाखांची रोकड आणि १५ लाखांची कार लंपास

On: October 5, 2026 9:12 PM
Follow Us:
---Advertisement---

१२ कोटींच्या कमिशनसाठी कंत्राटदाराच्या कार्यालयासमोर दरोडा

 

चिकलठाणा एमआयडीसीतील थरार; सव्वा तीन लाखांची रोकड आणि १५ लाखांची कार लंपास

 

छत्रपती संभाजीनगर | दैनिक शब्दमत वृत्तसेवा

 

चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील महिंद्रा शोरूमच्या मागील गल्लीत इंडस्ट्रियल कंत्राटदाराच्या कार्यालयासमोर उभ्या असलेल्या कारवर १० ते १२ जणांच्या टोळक्याने दरोडा टाकल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी दुपारी घडली. या घटनेत कारमधील सव्वा तीन लाख रुपयांची रोकड आणि सुमारे १५ लाख रुपये किमतीची कार असा मुद्देमाल लुटून नेण्यात आला. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिसांनी ३ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

 

ज्ञानेश्वर दादासाहेब बारे (वय ३४, रा. शाश्वत रेसिडेन्सी, ईटखेडा, पैठण रोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, ३० सप्टेंबर रोजी दुपारी साडेअडीचच्या सुमारास ते चिकलठाणा एमआयडीसीतील कार्यालयात होते. त्यांची एमएच-२०-एफयू-७००० क्रमांकाची कार कार्यालयाच्या पार्किंगमध्ये उभी होती. त्यावेळी कारमध्ये चालक उपस्थित होता.

 

अचानक १० ते १२ जणांचे टोळके तेथे आले. त्यांनी चालकाला धमकावत कारमधून खाली उतरवले आणि कार जबरदस्तीने घेऊन तेथून पसार झाले. कारमध्ये सव्वा तीन लाख रुपयांची रोकड असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचेही पोलिसांनी सांगितले.

 

१२ कोटी रुपयांच्या कमिशनचा आरोप

 

फिर्यादीत राहुल साहेबराव चाबुकस्वार (वय ४५, रा. पुंडलिकनगर) हा १२ कोटी रुपयांचे कमिशन मागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कंत्राटदाराने आपल्या म्हणण्यानुसार वागावे, या उद्देशाने सुधीर गोरखनाथ कातकडे (वय ४०, रा. अमृत साई गोल्ड सिटी, पैठण रोड) आणि राहुल चाबुकस्वार यांनीच गुंडांना पाठवून ही घटना घडवून आणल्याचा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे.

 

मात्र, १२ कोटी रुपयांचे कमिशन नेमके कोणत्या व्यवहाराच्या किंवा कामाच्या संदर्भात मागितले होते, याबाबत सध्या स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. या बाबीचा उलगडा पोलिसांच्या तपासातून होण्याची शक्यता आहे.

 

पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर कातकडे आणि राहुल चाबुकस्वार यांच्यासह १० ते १२ जण संशयितांच्या यादीत आहेत. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, कारचा माग काढण्यासह अन्य पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. या घटनेमुळे चिकलठाणा एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मुकुंदवाडीत नागरिकाच्या सतर्कतेमुळे घरफोडीचा प्रयत्न उधळला; गारखेड्यात वृद्धेला लाथ मारून लुटण्याचा प्रयत्न करणारा अल्पवयीनही पकडला

सिडको पोलिसांची मोठी कारवाई; ६ जणांच्या जेրात्मक मुसक्या आवळत ४ पिस्तुले व ११ जीवंत काडतुसे जप्त! छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):

मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपमुळे महायुतीत मोठा भडका; भाजप-शिवसेना आमनेसामने

दुष्काळसदृश परिस्थितीमुळे १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; AIMIM ची विभागीय आयुक्तांकडे मागणी

दहा लाखांची खंडणी दे, अन्यथा जीवे मारू!’ मा. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना धमकी; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ पुंडलिकनगर पोलीस ठाण्याबाहेर समर्थकांचा मध्यरात्रीपर्यंत ठिय्या; दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी

नागपूर पदवीधर मतदारसंघ: एकाच नंबरवरून तब्बल २२ हजार मतदारांची नोंदणी; काँग्रेसचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

Leave a Comment