मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

छ संभाजीनगर महानगरपालिका नगरसेवक अपात्रता प्रकरणी मनपात सुनावणी पार; पुढील सुनावणी १६ नोव्हेंबरला

On: October 12, 2026 11:35 PM
Follow Us:
---Advertisement---

 

नगरसेवक अपात्रता प्रकरणी मनपात सुनावणी पार; पुढील सुनावणी १६ नोव्हेंबरला

छत्रपती संभाजीनगर (विशेष प्रतिनिधी):

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणूक विभागामार्फत नगरसेवकांच्या सदस्यत्व अपात्रतेसंदर्भात सोमवारी (दि. १२ ऑक्टोबर) महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम १०(१) व १०(१-ड) अन्वये ही सुनावणी घेण्यात आली असून, विविध तक्रारींवर सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणांची पुढील सुनावणी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी निश्चित करण्यात आली आहे.

मनपा निवडणूक विभागाने जारी केलेल्या सुनावणीच्या अधिकृत यादीमध्ये एकूण आठ प्रकरणांचा समावेश होता. यामध्ये मुख्यतः शहरांमधील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांसंदर्भातील तक्रारींवर सुनावणी झाली. याशिवाय, काही नगरसेवकांच्या बाबतीत दोनपेक्षा अधिक अपत्ये (अपत्य नियम) असल्याच्या कारणावरून दाखल झालेल्या अपात्रतेच्या अर्जांवरही सविस्तर चर्चा झाली.

‘या’ नगरसेवकांच्या प्रकरणांवर सुनावणी

सोमवारी पार पडलेल्या सुनावणीत संबंधित नगरसेवक आणि तक्रारदारांना उपस्थित राहण्याबाबत नमूद करण्यात आले होते. सुनावणीच्या यादीत खालील नगरसेवकांच्या प्रकरणांचा समावेश होता:

* फराजाना शेख गुलाम रसूल

* मुन्शी भिकन शेख

* पठाण मझहर पठाण अय्युब

* स्वामी विश्वनाथ गुरुलिंग

* अली मिर वाजिद

* अशोक रंगनाथ हिरवाळे

* अब्दुल समीर साजिद

मनपा प्रशासनाने दोन्ही बाजूंचे म्हणणे व कागदपत्रे लक्षात घेत या सर्व प्रकरणांची पुढील सुनावणी सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या आगामी सुनावणीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे व नागरिकांचे

लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मुकुंदवाडीत नागरिकाच्या सतर्कतेमुळे घरफोडीचा प्रयत्न उधळला; गारखेड्यात वृद्धेला लाथ मारून लुटण्याचा प्रयत्न करणारा अल्पवयीनही पकडला

सिडको पोलिसांची मोठी कारवाई; ६ जणांच्या जेրात्मक मुसक्या आवळत ४ पिस्तुले व ११ जीवंत काडतुसे जप्त! छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):

मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपमुळे महायुतीत मोठा भडका; भाजप-शिवसेना आमनेसामने

दुष्काळसदृश परिस्थितीमुळे १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; AIMIM ची विभागीय आयुक्तांकडे मागणी

दहा लाखांची खंडणी दे, अन्यथा जीवे मारू!’ मा. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना धमकी; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ पुंडलिकनगर पोलीस ठाण्याबाहेर समर्थकांचा मध्यरात्रीपर्यंत ठिय्या; दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी

नागपूर पदवीधर मतदारसंघ: एकाच नंबरवरून तब्बल २२ हजार मतदारांची नोंदणी; काँग्रेसचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

Leave a Comment