मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

दिल्लीतील आंदोलनात खासदाराला पोलिसांकडून बेदम मारहाण; सीपीआय(एम) पक्षाचा खळबळजनक आरोप

On: October 13, 2026 9:27 AM
Follow Us:
---Advertisement---

 

दिल्लीतील आंदोलनात खासदाराला पोलिसांकडून बेदम मारहाण; सीपीआय(एम) पक्षाचा खळबळजनक आरोप

नवी दिल्ली (विशेष बातमीदार):

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण लागल्याचे समोर येत आहे. दिल्ली पोलिसांनी आपल्या मर्यादा ओलांडून राज्यसभेचे खासदार जॉन ब्रिटास यांना बेदम मारहाण केली आणि त्यांना रस्त्याच्या कडेला सोडून दिले, असा धक्कादायक आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (मार्क्सवादी – CPI(M)) केला आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट

या घटनेबाबत सीपीआय(एम) पक्षाने आपल्या अधिकृत ‘एक्स’ (ट्विटर) हँडलवरून माहिती देत एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये खासदार जॉन ब्रिटास हे दिल्ली पोलिसांच्या व्हॅनच्या दरवाजाजवळ जखमी अवस्थेत पडलेले दिसत आहेत. मारहाणीमुळे ते प्रचंड वेदनेत असल्याचे आणि त्यांना उठण्यास व चालण्यास त्रास होत असल्याचे दिसत आहे. त्यांना चालण्यासाठी एका व्यक्तीची व पोलिसांची मदत घ्यावी लागल्याचे या व्हिडिओत स्पष्ट होत आहे.

आंदोलनाची पार्श्वभूमी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ‘इंडिया’ आघाडीकडून गेल्या आठवड्यापासून सातत्याने आंदोलने केली जात आहेत. कॉक्रॉच जनता पार्टी आणि डाव्या पक्षांसह इतर अनेक संघटनांनी दिल्लीत आंदोलनाची हाक दिली होती. आंदोलनाची तीव्रता वाढू नये म्हणून पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून हजारो आंदोलकांची धरपकड केली आहे. या दरम्यानच डाव्या पक्षाचे नेते आणि खासदार जॉन ब्रिटास यांच्यावर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आल्याचा दावा पक्षाने के

ला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

माजी आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांचा राजकारणात प्रवेश; ‘जननीति भारत’ पक्षाची स्थापना करून निवडणूक लढवण्याची घोषणा

आमदारकी लोकसेवेचे साधन की केवळ उत्पन्नाचे मूळ? आमदार सतीश चव्हाण यांच्या शपथपत्रातून धक्कादायक माहिती उघड; विरोधकांकडून कोंडीची शक्यता

ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न? महिला पोलिसांच्या ताब्यात कोलकात्यात दुर्गापूजा मंडपाच्या उद्घाटनावेळी कथित गैरवर्तन; मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

घाटी रुग्णालयातील कथित आर्थिक अनियमिततेची चौकशी करा! खरेदी, बांधकामे आणि आर्थिक व्यवहारांचे विशेष लेखापरीक्षण करण्याची मागणी; तक्रारदारांचे चौकशी समितीसमोर पुराव्यांसह निवेदन

शेतकरी प्रश्नांवर काँग्रेसचा मोर्चा; पोलिसांकडून कलम १६८ अंतर्गत नोटीस १४ ऑक्टोबर रोजी मोर्चाचे आयोजन; आचारसंहिता आणि जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सूचना

Leave a Comment