मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

आमदारकी लोकसेवेचे साधन की केवळ उत्पन्नाचे मूळ? आमदार सतीश चव्हाण यांच्या शपथपत्रातून धक्कादायक माहिती उघड; विरोधकांकडून कोंडीची शक्यता

On: October 15, 2026 8:32 AM
Follow Us:
---Advertisement---

 

आमदारकी लोकसेवेचे साधन की केवळ उत्पन्नाचे मूळ?

आमदार सतीश चव्हाण यांच्या शपथपत्रातून धक्कादायक माहिती उघड; विरोधकांकडून कोंडीची शक्यता

छत्रपती संभाजीनगर: दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

सलग तीन टर्म मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर यंदा चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांच्याबाबत निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या १८ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी पदवीधरांसाठी नेमके काय केले, असा प्रश्न विचारला जात असतानाच, आमदार सतीश चव्हाण यांच्यासाठी आमदारकी हे लोकसेवेचे नव्हे तर केवळ उत्पन्नाचे साधन असल्याचे त्यांच्याच शपथपत्रातून स्पष्ट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

शपथपत्रातील माहितीमुळे विरोधकांच्या हाती कोलीत

आमदार सतीश चव्हाण यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रात आपल्याकडे व आपल्या पत्नीकडे असलेली ३१ कोटी रुपयांहून अधिक स्थावर व जंगम मालमत्ता जाहीर केली आहे. याशिवाय सोने, चांदी आणि हिरे असल्याचा उल्लेखही त्यात आहे. विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या उत्पन्नाच्या साधनात ‘शेती’सोबतच ‘आमदारकी’ हे उत्पन्नाचे मूळ साधन असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे मागील १८ वर्षे त्यांनी पदवीधर मतदारसंघाच्या आमदारकीकडे केवळ उत्पन्नाचे साधन म्हणूनच पाहिले का, असा थेट सवाल आता मतदार आणि विरोधक विचारू लागले आहेत.

१८ वर्षांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह

आमदार सतीश चव्हाण हे २००८ मध्ये पहिल्यांदा मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर २०१४ आणि २०२० च्या निवडणुकांमध्येही त्यांनी विजय मिळवला. मात्र, गेल्या १८ वर्षांत मराठवाड्यातील उच्चशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करून देण्यात आलेले अपयश, शिक्षक व प्राध्यापकांचे प्रलंबित प्रश्न, आणि कंत्राटी नोकरभरतीला विरोध करून नियमित सरकारी भरतीसाठी आग्रही भूमिका न घेणे यांसारख्या मुद्यांवरून पदवीधर मतदारांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर रोष

सजग पदवीधर मतदारांकडून सोशल मीडियावर थेट नाराजी आणि रोष व्यक्त केला जात आहे. लोकप्रतिनिधींनी आमदारकीकडे लोकसेवेचे साधन म्हणून पाहावे ही अपेक्षा असताना, उत्पन्नाचे साधन म्हणून आमदारकीचा उल्लेख केल्याचा हा कळीचा मुद्दा आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत विरोधकांकडून उचलून धरला जाण्याची आणि आमदार चव्हाण यांची कोंडी करण्याची शक्यता वर्तवली

जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

माजी आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांचा राजकारणात प्रवेश; ‘जननीति भारत’ पक्षाची स्थापना करून निवडणूक लढवण्याची घोषणा

ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न? महिला पोलिसांच्या ताब्यात कोलकात्यात दुर्गापूजा मंडपाच्या उद्घाटनावेळी कथित गैरवर्तन; मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

घाटी रुग्णालयातील कथित आर्थिक अनियमिततेची चौकशी करा! खरेदी, बांधकामे आणि आर्थिक व्यवहारांचे विशेष लेखापरीक्षण करण्याची मागणी; तक्रारदारांचे चौकशी समितीसमोर पुराव्यांसह निवेदन

शेतकरी प्रश्नांवर काँग्रेसचा मोर्चा; पोलिसांकडून कलम १६८ अंतर्गत नोटीस १४ ऑक्टोबर रोजी मोर्चाचे आयोजन; आचारसंहिता आणि जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सूचना

हप्ता देण्यास नकार दिल्याने व्यापाऱ्यावर चाकूहल्ला; हत्येचा प्रयत्न ‘आम्ही या परिसरातील डॉन आहोत’ म्हणत धमकी; मुकुंदवाडी रेल्वेस्थानक परिसरातील घटनेने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Leave a Comment