कर्णपुरा देवी मंदिरात हजारो महिलांच्या सहभागातून दुर्गा सप्तशती पाठ उत्साहात संपन्न
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : कर्णपुरा देवी मंदिर संस्थान येथे रविवारी, १८ ऑक्टोबर रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा केंद्र, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर प्रणित सामूहिक दुर्गा सप्तशती पाठ भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. या धार्मिक कार्यक्रमात हजारो महिला भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामूहिक दुर्गा सप्तशतीचे पठण केले.
आदिशक्ती माता जगदंबेच्या भक्तीने भारावलेल्या वातावरणात महिलांनी श्रद्धापूर्वक दुर्गा सप्तशतीचे पठण केले. सामूहिक मंत्रोच्चार आणि भक्तिभावामुळे संपूर्ण मंदिर परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते. या उपक्रमातून धार्मिक परंपरा, संस्कार आणि सामूहिक भक्तीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
कर्णपुरा देवी मंदिर संस्थानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला महिला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने महिलांच्या उपस्थितीमुळे मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. श्रद्धा, भक्ती आणि सामूहिक साधनेच्या वातावरणात दुर्गा सप्तशती पाठाची सांगता झाली.
दैनिक शब्दमत | छत्रपती संभाजीनगर







