मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

मढी यात्रेत लागली मुस्लिमांची दुकाने ! ‘देवस्थानच्या विश्वस्तांचे ‘ते’नातेवाईक’ म्हणत संजय मरकड यांचा तिळपापड !

On: March 9, 2026 9:34 AM
Follow Us:
---Advertisement---

 

 

Madhi Kanifnath Yatra : मढी यात्रेत लागली मुस्लिमांची दुकाने? ‘देवस्थानच्या विश्वस्तांचे ‘ते’ नातेवाईक’ म्हणत संजय मरकड यांचा तिळपापड !

पाथर्डी:दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

Sarpanch Sanjay Markad reacts after the temple trust allowed Muslim traders to set up shops at the Shri Kshetra Madhi Kanifnath Yatra in Pathardi: पाथर्डी इथल्या श्री क्षेत्र मढी कानिफनाथ देवस्थान यात्रेत, देवस्थानच्या विश्वस्तांनी दिलेल्या गाळ्यांमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांनी दुकाने थाटली होती.

 

गावातील मुस्लिमांनाही परवानगी नाही

 

‘ग्रामपंचायतीच्या हद्दीत, जे गावातील मुस्लिम होते, त्यांना देखील यात्रेत दुकाने लावण्यास मढी ग्रामपंचायतीने परवानगी नाकारली आहे. पण कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे जे गाळे आहेत, त्यांनी मात्र मुस्लिमांना परवानगी दिली आहे. कदाचित ते नातेवाईक असावेत. म्हणून त्यांनी त्यांना परवानगी दिली असावी,’ असा घणाघात मरकड यांनी केला आहे.

 

विठ्ठल मरकड म्हणाले…

 

देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठल मरकड यांनी, यावर्षी भाविकांनी जास्त प्रमाणात गर्दी केली आहे. यात्रेच्या मुख्य आजच्या दिवशी जवळपास 15 लाख भाविकांनी मढीत हजेरी लावली आहे. भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी देवस्थानच्यावतीने विविध उपयोजना केल्या आहे, असे सांगितले.

 

औरंगाबाद खंडपीठाने ग्रामपंचायतीच्या ठरावाला स्थगिती दिली होती. परंतु हा ठराव असल्याने, तो रद्द करण्यासाठी पुन्हा ठराव घेणे गरजेचा आहे. पण सध्या प्रशासकीय राज ग्रामपंचायतींमध्ये सुरू असल्याने, सरपंच संजय मरकड यांनी गेल्यावर्षीचा ठराव पुन्हा पुढे करत, मुस्लिम व्यावसायिकांना विरोधाचा मुद्दा लावून धरला.

यासाठी सकल हिंदू समाजाचा मेळावा मढी इथं घेतला. आमदार संग्राम जगताप, आमदार महेश लांडगे यांनी या मेळाव्यात आग ओकणारं भाषण केलं. परंतु मढी देवस्थानच्या विश्वस्तांनी मुस्लिम व्यवसायिकांना आजच्या मुख्य यात्रेत व्यवसायिसाठी गाळे दिले. यावरून संजय मरकड चांगलेच आक्रमक झाले.य

 

पाच हजार व्यावसायिकांना परवाने?

 

संजय मरकड म्हणाले, “मढी ग्रामपंचायतीच्यावतीने 2700 व्यावसायिकांना व्यवसायासाठी परवाने देण्यात आले. काही व्यावसायिकांना जागेवर कागदपत्रांची तपासणी करून, परवाने दिले. व्यावसायिकांचा आकडा साडेचार ते पाच हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेत दुकाने लावण्याचा निर्णय ऐतिहासिक झाला. यामुळे मढीत आज 25 ते 27 लाख भाविक मढीत असल्याचा दावा मरकड यांनी केला.”

 

Madhi Kanifnath Yatra controversy: पाथर्डी इथल्या श्री

 

क्षेत्र मढी कानिफनाथ यात्रेत, मुस्लिम व्यावसायिकांना दुकाने न लावून देण्याच्या भूमिकेवर मढी ग्रामपंचायत आक्रमक झाली होती. तसा गेल्या वर्षी ठराव पुढे करत, यावर्षी देखील मुस्लिम व्यावसायिकांना विरोध करण्यात आला.

 

सकल हिंदू समाजाने आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap), आमदार महेश लांडगे यांची मढी इथं आक्रमक सभा घेतली. देवस्थानच्या विश्वस्तांनी देवस्थांच्या मालकीच्या गाळे मुस्लिम व्यावसायिकांना देत, व्यवसायाला मुभा दिला. यावरून सरपंच संजय मरकड यांचा तिळपापड झाला असून, त्यांनी हे मुस्लिम व्यावसायिक देवस्थान विश्वस्तांचे नातेवाईक असतील, असा घणाघात केला आहे.

यासाठी सकल हिंदू समाजाचा मेळावा मढी इथं घेतला. आमदार संग्राम जगताप, आमदार महेश लांडगे यांनी या मेळाव्यात आग ओकणारं भाषण केलं. परंतु मढी देवस्थानच्या विश्वस्तांनी मुस्लिम व्यवसायिकांना आजच्या मुख्य यात्रेत व्यवसायिसाठी गाळे दिले. यावरून संजय मरकड चांगलेच आक्रमक झाले.य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment