मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

तुकाराम मुंढे इम्पॅक्ट? अलिशान कारमधून गुटखा जप्त; २८.८८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, श्रीगोंद्यात पोलिसांची धडक कारवाई

On: July 1, 2026 10:20 AM
Follow Us:
---Advertisement---

तुकाराम मुंढे इम्पॅक्ट? अलिशान कारमधून गुटखा जप्त; २८.८८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, श्रीगोंद्यात पोलिसांची धडक कारवाई

 

अहिल्यानगर | प्रतिनिधी

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

राज्यात प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूविरोधात सुरू असलेल्या धडक कारवाईच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत अलिशान कारमधून वाहतूक केला जाणारा गुटखा जप्त केला. या कारवाईत २८ लाख ८८ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

 

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांबाबत गस्त घालत असताना गुप्त माहितीदारामार्फत मुंढेकरवाडी येथे प्रतिबंधित गुटखा साठवून विक्रीसाठी वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला.

 

मुंढेकरवाडी येथील अमोल जाधव याच्या राहत्या घराजवळ पोलिसांनी पाहणी केली असता, पांढऱ्या रंगाच्या अलिशान कारमधून काही गोण्या स्विफ्ट कारमध्ये भरल्या जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ छापा टाकून अमोल जाधव, अनिल कुरुमकर आणि फरहान बेपारी या तिघांना ताब्यात घेतले.

 

कारवाईदरम्यान आरोपींकडून ६,०३,२०० रुपयांचा आरएमडी, विमल पान मसाला व व्ही-१ सुगंधी तंबाखू, २२ लाख रुपयांच्या दोन चारचाकी गाड्या (अल्काझार व स्विफ्ट), ३०,१३० रुपयांची रोख रक्कम तसेच ५५ हजार रुपयांचे तीन मोबाईल फोन असा एकूण २८,८८,३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

 

दरम्यान, राज्यात अन्न व औषध प्रशासनाकडून प्रतिबंधित गुटखाविरोधात सुरू असलेल्या व्यापक कारवाईनंतर पोलीस यंत्रणाही अधिक सक्रिय झाल्याचे या कारवाईवरून स्पष्ट होत आहे. अनेक ठिकाणी गुटखा माफियांविरोधात सलग धडक मोहिमा राबविण्यात येत असून, अशा अवैध व्यवसायांवर कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

 

 

नांदेडमध्ये गैरवर्तन करणाऱ्या दोन पोलिसांचे निलंबन

 

नांदेड | प्रतिनिधी

 

कर्तव्यात गैरवर्तन करून पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी उमरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार सुनील कोलबुद्धे आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल महमद आवेज यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

 

२३ जून रोजी उमरी–धर्माबाद मार्गावर शासकीय दुचाकीवर ड्युटी बजावत असताना या दोन्ही कर्मचाऱ्यांचे वर्तन अत्यंत गंभीर व आक्षेपार्ह असल्याचे समोर आले होते. या घटनेची गंभीर दखल घेत नांदेडचे पोलीस अधीक्षक यांनी दोघांच्या निलंबनाचे आदेश जारी केले.

 

या कारवाईमुळे पोलीस दलातील शिस्तभंग, गैरवर्तन आणि कर्तव्यातील हलगर्जीपणाला कोणतीही मुभा दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment