मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

राज्यपाल हरिभाऊ बागडेंची प्रकृती बिघडली, ICU मध्ये उपचार सुरू; उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची हॉस्पिटलमध्ये गर्दी

On: March 11, 2026 12:49 AM
Follow Us:
---Advertisement---

 

 

राज्यपाल हरिभाऊ बागडेंची प्रकृती बिघडली, ICU मध्ये उपचार सुरू; उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची हॉस्पिटलमध्ये गर्दी

 

Governor Haribhau Bagde Admitted Jaipur Hospital:

 

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची प्रकृती बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यपालांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समजताच नेत्यांनी आणि त्यांच्या नीकटवर्तीयांना गर्दी केली आहे.

प्रकृती अचानक बिघडली.

 

जयपूरच्या सवाई मानसिंग (एसएमएस) रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल.

 

नियमित आरोग्य तपासणीदरम्यान प्रकृती बिघडल्याची माहिती.

 

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची प्रकृती बिघडली असून त्यांना जयपूरमधील सवाई मानसिंग (एसएमएस) रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. राज्यपाल हरिभाऊ बागडे आपल्या नियमित आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते, परंतु तपासणीदरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना ताबडतोब आयसीयूमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला.

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी मिळताच, अनेक नेते आणि अधिकारी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचलेत. आरोग्यमंत्री गजेंद्र सिंह खिंवसार यांनीही एसएमएस रुग्णालयात जाऊन राज्यपालांच्या प्रकृतीची माहिती डॉक्टरांकडून घेतली. याशिवाय उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरवा हे देखील राज्यपालांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले.

 

रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, राज्यपालांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, राज्यपाल दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नियमित तपासणीसाठी एसएमए रुग्णालयात गेले होते. सुरुवातीच्या तपासणीदरम्यान, त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना ताप आला त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून डॉक्टरांनी त्यांना मेडिकल आयसीयू-२ मध्ये दाखल केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment