इराणमधून भारतात उड्डाणाच्या तयारीत असलेल्या विमानावरच अमेरिकेचा हल्ला; विमानतळावर मोठा एअरस्ट्राइक
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
इराणमधून भारतात उड्डाणाच्या तयारीत असलेल्या विमानावरच अमेरिकेचा हल्ला; विमानतळावर मोठा एअरस्ट्राइक
Iran Israel War: अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात ‘महान एअर’च्या
एका विमानाचं नुकसान झालं आहे. महत्वाचं म्हणजे हे विमान भारतात
Iran Israel War: इराण आणि इस्रायलमधील युद्ध महिना
झाला तरी अद्याप सुरु असून हा संघर्ष निवळण्यापेक्षा वाढतच चालला आहे. यादरम्यान अमेरिकेने इराणमधील मशहद विमानतळावर हवाई हल्ला केला आहे. अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात ‘महान एअर’च्या एका विमानाचं नुकसान झालं आहे. महत्वाचं म्हणजे हे विमान भारतात येणार होतं. इराणमधील नागरिकांना लागणारी आवश्यक ती मदत
नोव्हेंबर २०२१ मध्ये, महान एअरवर सायबर हल्ला झाल्याचेही वृत्त होते. आता, इराणमधील मशहद विमानतळावर महान एअरलाइन्सच्या विमानावर हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले आहे, जे विमान मदत मोहिमेचा भाग म्हणून दिल्लीला जात होते. इराणमधील गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीहून तेहरानला मदत साहित्य पाठवले जात आहे.
महान एअर आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवते
महान एअर ही तेहरानमध्ये मुख्यालय असलेली एक खाजगी इराणी विमान कंपनी आहे. ही विमान कंपनी मध्य पूर्व, युरोप आणि आशियातील अनेक देशांमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवते.
ही प्रामुख्याने तेहरानहून चीनमधील ग्वांगझो, भारतातील दिल्ली आणि इतर देशांमधील शहरांसाठी उड्डाणे चालवते. हे विमान यावेळी दिल्लीला जाणार होते, परंतु अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात ते नष्ट झाले.
मागील काही दिवसांपासून इराण-अमेरिका युद्ध सुरू आहे. या युद्धात आता शांतता आणि सलोख्याची चर्चा सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पण हल्ले मात्र सुरूच आहेत. आता अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणी एअरलाइन्सचे एक विमान खराब झाले आहे. इराणच्या महान एअरलाइन्सचे हे विमान अमेरिकेच्या हवाई हल्ल्याचे बळी ठरले असल्याचे वृत्त आहे. हे विमान मदत साहित्य घेण्यासाठी दिल्लीला जाणार होते. भारताकडून मानवतावादी मदत घेण्यासाठी ते १ एप्रिल रोजी पोहोचणार होते, परंतु मशहद विमानतळावरील अमेरिकेच्या हल्ल्यात विमानाचे नुकसान झाले.
ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे अमेरिकेचे नुकसान? या देशात अमेरिकी सैनिकांना हाकलून देण्याची वाढली मागणी
अमेरिकेने इराणच्या मशहद आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठा हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात महान एअरलाइन्सच्या विमानासह मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा हा हल्ला झाला, तेव्हा एक विमान दिल्लीसाठी उड्डाण करण्याच्या तयारीत होते. इराणी सरका सूत्रांनी सांगितले की, या हल्ल्यात महान एअरचे एक नागरी विमान नष्ट झाले. वृत्तांनुसार, हे विमान दिल्लीकडे जात होते आणि युद्धग्रस्तांसाठी ११ टनांहून अधिक मानवतावादी औषधे घेऊन इराणला परत येणार होते. उड्डाण करण्यापूर्वीच मशहद विमानतळावरील हल्ल्यात हे विमान नष्ट झाले.











