मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

रस्त्यांच्या कामासाठी २४० कोटीचा निधी मंजूर; अनेक गावे जोडली जाणार आमदार संतोष दानवे

On: July 1, 2026 4:58 PM
Follow Us:
---Advertisement---

रस्त्यांच्या कामासाठी २४० कोटीचा निधी मंजूर; अनेक गावे जोडली जाणार  आमदार संतोष दानवे

जाफराबाद प्रतिनिधि

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या

विकासाला गती देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आशियाई विकास बँक सहाय्यित ‘महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्प’ अंतर्गत मतदार संघातील मुख्य रस्त्यासाठी २४० कोटीचा निधी मंजूर करण्यात आला.

मतदारसंघातील रामा २२४ ते बरंजळा लोखंडे – बरंजळा साबळे जवखेडा ठेंग – जानेफळ पं- बोरगाव (बु)- बोरी (खु)-बोरगाव (मठ)- भारज (बु)-भारज (खु)- वरुड (बु)-कोनड (बु) ते जिल्हा सरहद्द या प्रमुख मार्गाच्या

आ. संतोष दानवे यांच्या पाठपुराव्याला यश

बैठक घेऊन निधी मंजूर करून घेतला

विद्यार्थ्यांचा शाळा-महाविद्यालयातील प्रवास, रुग्णांना आरोग्यसेवा मिळविणे तसेच नागरिकांचे दैनंदिन दळणवळण अधिक सुखकर होणार असल्याने या कामाबद्दल मतदार संघातील नागरिकांनी आमदार संतोष पाटील दानवे यांचे आभार मानून कौतुक केले आहे. या रस्त्याच्या मंजुरीसाठी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे व आमदार संतोष पाटील दानवे यांनी सातत्याने पाठपुरावा करून वेळो-वेळी शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अखेर रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर करून घेतला आहे.

सुधारणा व मजबुतीकर करण्यात येणार आहे. या रस्त्यामुळे दोन्ही तालुक्यातील अनेक गावांना फायदा होणार असून आठवडी बाजारपेठ असलेली गावे जोडल्या जात आहेत. त्यामध्ये बरांजळा (साबळे), जवखेडा (ठेंग), माहोरा, बोरगाव (बु), वरुड (बु), भारज (बु), चापनेर, धोंडखेडा, बेलोरा या गावांना मोठ्या प्रमाणात

फायदा होणार आहे. या रस्त्याच्या कामामुळे मतदारसंघातील अनेक गावांचा मुख्य रस्त्याशी संपर्क अधिक सक्षम होणार असून, ग्रामीण भाग विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मोठी मदत होणार आहे. विशेषतः शेतकरी बांधवांना शेतमाल बाजारपेठेत पोहोचविणे अधिक जलद, सुरक्षित व कमी खर्चिक होईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

पाणी पिऊन उपोषण मागे नाही, केवळ ‘लाड भाऊं’च्या आग्रहास्तव घोटभर पाणी; सर्व मागण्यांवर तीन दिवसांत अंमलबजावणी करा, अन्यथा…

टेंभुर्णीत वानरांचा धुमाकूळः तीन जण गंभीर जखमी, वनविभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप

अवैध धंद्यांच्या विरोधात टेंभुर्णी पोलीस ‘ॲक्शन मोड’वर! खबरदार… अवैध धंदे कराल तर खावी लागेल जेलची हवा! .

वाघरुळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी

गाडेगव्हाण रस्त्यावर चिखल अन् घाणीचे साम्राज्य ! शाळकरी मुलांची जीवघेणी कसरत; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष तक्रारीनंतरही तात्पुरत्या मलमपट्टीचा प्रयत्न; थेट सिमेंट रस्त्याची गावकऱ्यांची ठाम मागणी

Leave a Comment