मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

फिटनेस, भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी जाफ्राबाद-पंढरपूर सायकल वारी ९ जुलैपासून *

On: July 8, 2026 9:01 PM
Follow Us:
---Advertisement---

फिटनेस, भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी जाफ्राबाद–पंढरपूर सायकल वारी ९ जुलैपासून*

जाफराबाद प्रतिनिधि : मोहम्मद बाईयाश

भोकरदन-जाफ्राबाद सायकल असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेली चौथी भव्य भोकरदन–पंढरपूर सायकल वारी येत्या 9 जुलैपासून सुरू होत आहे. भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यातील सायकलिस्ट वारकरी तब्बल 400 किलोमीटरचा सायकल प्रवास करून 11 जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहेत.
ही वारी केवळ पंढरपूर दर्शनापुरती मर्यादित नसून फिटनेस, पर्यावरण संवर्धन, सामाजिक ऐक्य आणि विठ्ठल भक्तीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे. सायकलिंगमुळे निरोगी जीवनशैली, इंधन बचत आणि प्रदूषणमुक्त पर्यावरणाचा संदेशही जनतेपर्यंत पोहोचविला जाणार आहे.
भोकरदन–जालना–गेवराई–बार्शी–पंढरपूर असा या वारीचा मार्ग असून, संपूर्ण प्रवासात विठ्ठल नामाचा गजर, शिस्तबद्ध सायकल रॅली आणि जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
१२ जुलै रोजी पंढरपूर येथे सर्व सायकलिस्ट वारकरी भव्य रिंगण सोहळा आणि नगर प्रदक्षिणेत सहभागी होणार असून, त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन वारीची सांगता होणार आहे.
या वारीचे अध्यक्ष डॉ. पंडित सुरशे, उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर थोरात, सचिव लक्ष्मण सुरडकर आणि वारी प्रमुख डॉ. राहुल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण नियोजन पूर्ण झाले असून, सहभागी सायकलिस्ट वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
“फिट राहूया, सायकल चालवूया आणि विठ्ठल भक्तीचा संदेश घराघरात पोहोचवूया” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली ही सायकल वारी मराठवाड्यातील फिटनेस आणि भक्तीचा एक प्रेरणादायी उपक्रम म्हणून ओळख निर्माण करत आहे.

चौकट *विठू नामाचा गजर आणि सायकलचे पॅडल या वारीची बातच काही वेगळी आहे पायी वारीची परंपरा जपत, आजच्या तरुण***पिढीने आरोग्याची आणि निसर्गाची सुंदर जोड देत ‘सायकल वारी’ सुरू केली आहे शेकडो किलोमीटर सायकल चालवून विठ्ठलाचे दर्शन घेणे म्हणजे शारीरिक आणि मानसिक ताकदीची कसोटी आहे
डॉ पंडित सुरशे सायकलिस्ट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

जिल्हा परिषद शाळेचा ऐतिहासिक निकाल! 8 पैकी 7 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक मेहनत, जिद्द आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाने मिळवले यश -विद्यार्थी व पालकांचा सत्कार

कुंभारझरी येथील वारकरी धर्म संकिर्तन सेवा प्रतिष्ठानला निर्मल दिंडी पुरस्कार २०२६जाहीर.

टेंभुर्णी येथील राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती उत्साहात साजरी*

टेंभुर्णी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार; कर भरूनही नागरिकांना कागदपत्रांसाठी हेलपाटे ग्रामसेवकासह पर्यायी अधिकारीही गैरहजर; स्वच्छता, पाणीपुरवठा व प्रशासकीय कामांवर परिणाम

जाफराबाद (प्रतिनिधी): जाफराबाद ते जळगाव ही एसटी बससेवा पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी जाफराबाद शहरातील व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment