मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

देव्हारीतील रस्ता कामावर पारदर्शकतेचा प्रश्न; माहिती फलक, ठेकेदार व अभियंता गायब असल्याचा ग्रामस्थांचा आरोप…

On: July 8, 2026 9:25 PM
Follow Us:
---Advertisement---

देव्हारीतील रस्ता कामावर पारदर्शकतेचा प्रश्न; माहिती फलक, ठेकेदार व अभियंता गायब असल्याचा ग्रामस्थांचा आरोप…

कामाच्या दर्जाबाबतही शंका; तांत्रिक तपासणी करून संपूर्ण माहिती जाहीर करण्याची नागरिकांची मागणी..

 

 

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

सोयगाव / प्रतिनिधी यासीन बेग

 

 

 

 

सोयगाव तालुक्यातील देव्हारी ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरून नागरिकांनी गंभीर आक्षेप नोंदवले असून, कामाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कामाच्या ठिकाणी ठेकेदार अथवा संबंधित अभियंता उपस्थित नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. तसेच, काम कोणत्या योजनेअंतर्गत व कोणत्या निधीतून सुरू आहे, याची माहिती देणारा अनिवार्य माहिती फलकही लावण्यात आलेला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

ग्रामस्थांच्या माहितीनुसार, रस्त्याच्या कामाची एकूण किंमत, मंजूर अंदाजपत्रक, संबंधित ठेकेदार, कार्यान्वयन करणारा विभाग तसेच काम पूर्ण होण्याचा कालावधी याबाबत कोणतीही माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. त्यामुळे हे काम नेमके कोणाच्या देखरेखीखाली सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, कामाच्या दर्जाबाबतही नागरिकांनी शंका व्यक्त केली आहे. संबंधित विभागाच्या अभियंत्यांनी नियमितपणे कामाची पाहणी करून गुणवत्ता तपासणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात अशी पाहणी होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन कामाची तांत्रिक तपासणी करावी, मंजूर अंदाजपत्रक व निधीची माहिती सार्वजनिक करावी, माहिती फलक त्वरित उभारावा आणि काम नियमानुसार सुरू आहे की नाही, याबाबत वस्तुस्थिती नागरिकांसमोर स्पष्ट करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणाबाबत संबंधित ठेकेदार, अभियंता किंवा संबंधित विभागाची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. त्यांची बाजू प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

पाणी पिऊन उपोषण मागे नाही, केवळ ‘लाड भाऊं’च्या आग्रहास्तव घोटभर पाणी; सर्व मागण्यांवर तीन दिवसांत अंमलबजावणी करा, अन्यथा…

टेंभुर्णीत वानरांचा धुमाकूळः तीन जण गंभीर जखमी, वनविभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप

अवैध धंद्यांच्या विरोधात टेंभुर्णी पोलीस ‘ॲक्शन मोड’वर! खबरदार… अवैध धंदे कराल तर खावी लागेल जेलची हवा! .

वाघरुळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी

गाडेगव्हाण रस्त्यावर चिखल अन् घाणीचे साम्राज्य ! शाळकरी मुलांची जीवघेणी कसरत; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष तक्रारीनंतरही तात्पुरत्या मलमपट्टीचा प्रयत्न; थेट सिमेंट रस्त्याची गावकऱ्यांची ठाम मागणी

Leave a Comment