दैनिक शब्दमत महाराष्ट्राचा बुलंद आवाज
छत्रपती संभाजीनगर ♦
वाळूज एमआयडीसी परिसरातील वाळूज महानगर येथील देवगिरी भागात एका घरात छापा मारून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी गुटख्याचा ७ लाख ८३ हजार ९०० रुपयांचा साठा जप्त केला आहे. गुटखामाफियाच्या कसून चौकशीत या साठ्याची माहिती मिळाली होती. ही कारवाई मंगळवारी (२ सप्टेंबर) करण्यात आली.
पोलिसांनी तिथे छापा मारला असता एकूण ७ लाख ८३ हजार ९०० रुपयांचा गुटख्याचा साठा मिळून आला. मालपाणीविरुद्ध यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. या गुन्ह्यात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश बन करत आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलीस आयुक्त संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश बन, पोलीस अंमलदार बाबासाहेब काकडे, जालींदर रेधे, सुरेश कचे, विलास वाघ, हनुमान ठोके, सुरेश भिसे, वैभव गायकवाड, रोहित चिंधाळे, नितीन इनामे, समाधान पाटील, लखन गुसिंगे, संतोष बमनात, संदिप तागड, शिवनारायण नागरे यांनी केली.
२८ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा अकराला वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे यांनी सहकाऱ्यांसह मिळून धुळे- सोलापूर हायवेवरील एएस क्लब चौकाजवळ गुटखा माफिया उमेश श्यामलाल मालपाणी (वय ३३, रा. वावरे चाळ पोलीस स्टेशनशेजारी, मनमाड ता. नांदगाव जि. नाशिक) याला अटक केली होती. त्याच्याकडे ४० हजार रुपयांचा गुटखा मिळून आला होता. मालपाणीची कसून चौकशी केली असता त्याने साथीदार संदीप उत्तमराव हिरे (वय ३८, रा. मदन किराणाजवळ नारळीबाग) याच्यासोबत मिळून देवगिरी वाळूज महानगर येथे एका घरात गुटखा साठवून ठेवल्याचे सांगितले.