मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

२२ नवनिर्वाचित नगरसेवक अडकले चौकशीच्या फेऱ्यात अतिक्रमण, अनधिकृत बांधकामाची तपासणी सुरू

On: February 28, 2026 8:09 AM
Follow Us:
---Advertisement---

२२ नवनिर्वाचित नगरसेवक अडकले चौकशीच्या फेऱ्यात

 

अतिक्रमण, अनधिकृत बांधकामाची तपासणी सुरू

छत्रपती संभाजी नगर:दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

नगरसेवकांविरोधात तक्रारी दाखल झाल्याने, हे नगरसेवक 2 छत्रपती संभाजीनगर: महापालिका निवडणुकीत विजयी होऊन सर्वसामान्यांचा आवाज बनून आलेले सुमारे २२ प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या रडारवर आले आहेत. नगरसेवकांविरोधात दाखल अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम केल्याच्या तक्रारींची अतिक्रमण विभाग आणि नगर रचना विभागाकडून चौकशी सुरू झाली आहे. त्यांचा अहवाल येताच, कारवाई करण्यात येईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

 

महापालिका निवडणुकीचा निकाल १६ जानेवारी रोजी लागला., आणि दुसऱ्या दिवसांपासून नगरसेवकांच्या विरोधकांनी कंबर कसली., नगरसेवकाने केलेल्या अतिक्रमण, अनधिकृत बांधकामांची तसेच तीन अपत्य असल्याच्या तक्रारी दाखल होण्यास सुरवात झाली. विशेष म्हणजे यात एमआयएम आणि भाजप नगरसेवकांची संख्या अधिक आहे. निकालानंतर

 

तीन अपत्यांच्या तक्रारीबाबत प्रशासनाची तक्रारदारांवर भिस्त

 

अवघ्या काही दिवसांमध्येच तब्बल २२ नगरसेवकांविरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत. या

 

१८ नगरसेवकांविरोधात अतिक्रमणाच्या तक्रारी

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिक्रमण व अनधिकृत बांधकामासंदर्भात सुमारे १८ तक्रारी आहेत. अनधिकृत बांधकामांच्या तक्रारींवर नगर रचना विभागामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

 

बांधकाम परवानगी घेण्यात आलेली आहे का? याचे रेकॉर्ड तपासले जात आहे.

 

तसेच इमारत निरीक्षकांकडून स्थळ पाहणी अहवाल मागविण्यात आला आहे. सर्व चौकशीनंतर नगर रचना विभाग आपला अहवाल निवडणूक विभागाला सादर करेल. निवडणूक विभागामार्फत हा अहवाल आयुक्तांकडे जाईल, आयुक्त अंतिम निर्णय घेतील, असे सूत्रांनी सांगितले.

 

तक्रारी दिल्या, आता पुरावेही द्या

 

दोन पेक्षा जास्त अपत्य असणा-यांना महापालिका निवडणूक लढविता येत नाही. तरीही काहींनी तीन अपत्यांबाबतची माहिती लपवून निवडणूक लढविली, व नगरसेवकही झाले.

 

अशा ४ नगरसेवकांच्या तक्रारी निवडणूक विभागाकडे आल्या आहेत. पण त्यासोबत तक्रारदारांनी पुरावे जोडलेले नाहीत. त्यामुळे पुरावे सादर करण्याची सूचना मनपा प्रशासनाने तक्रारदारांना केली आहे. पुरावे दिल्यावर त्याची शहानिशा करून पुढील कारवाही केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

 

तक्रारींची चौकशी करून त्यांचे पद रद्द करावे, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. काहींनी तर तक्रारींसोबत पुरावेही सादर केले आहेत. त्याआधारे

 

  • मनपा प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. दाखल तक्रारीं अतिक्रमण, नगर रचना विभागांकडे पाठविल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment