मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

छत्रपती संभाजीनगर येथे अदानी सिमेंट कंपनी तर्फे भव्य ‘गौरव उत्सव’ संपन्न

On: February 26, 2026 9:06 PM
Follow Us:
---Advertisement---

छत्रपती संभाजीनगर येथे अदानी सिमेंटछत्रपती संभाजीनगर येथे अदानी सिमेंट कंपनी तर्फे भव्य ‘गौरव उत्सव’ संपन्न कंपनी तर्फे भव्य ‘गौरव उत्सव’ संपन्न

जिल्ह्यातील प्रीमियम सिमेंट वापरणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरांचा सन्मान

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : आज दिनांक 18 फेब्रुवारी रोजी बुधवार अदानी सिमेंट कंपनी तर्फे हॉटेल ईनराईज सयाजी येथे भव्य ‘गौरव उत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंबुजा सिमेंट प्रीमियम सिमेंट जास्त प्रमाणात वापरणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर बंधूंचा गौरव करण्यात आला.या कार्यक्रमात अदानी सिमेंट चे जिल्ह्याप्रमुख भारत फरताडे साहेब,तसेच मराठवाडा विभाग प्रमुख राहुल पारधी साहेब उपस्थित होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवर कॉन्ट्रॅक्टर बंधूंचे पारंपरिक फेटे बांधून स्वागत करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्तावना अदानी सिमेंट कंपनीचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे टेक्निकल राहुल गांगवे इंजिनियर यांनी केली. त्यानंतर इंजिनियर चिल्लेश्वर चव्हाण यांनी उपस्थितांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या.

 

कार्यक्रमाची मुख्य प्रेझेंटेशन रिजनल टेक्निकल हेड राहुल पारधी यांनी दिली. त्यांनी कॉन्ट्रॅक्टर बंधूंशी विविध तांत्रिक विषयांवर सखोल चर्चा केली तसेच अदानी सिमेंट कंपनीतर्फे दिल्या जाणाऱ्या अपघाती विमा, मेडिक्लेम आणि बक्षीस योजनांची माहिती दिली. व्यवसाय वृद्धीसाठी विविध मार्गदर्शन करताना त्यांनी ‘कौन बनेगा बुनियादी चॅम्पियन (केबीबीसी)’ हा रोचक खेळही आयोजित केला, ज्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर बंधूंनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. योग्य उत्तरे देणाऱ्या सहभागींचा विशेष गिफ्ट देऊन गौरव करण्यात आला.

 

यानंतर प्रीमियम सिमेंटचा अधिक वापर करणाऱ्या आणि अदानी सर्टिफाईड हाऊस बांधणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरांचा सन्मान करण्यात आला.

यामध्ये —

सर्वाधिक अदानी सर्टिफाईड हाऊस बांधण्यासाठी :

माजिद शेख(वाळूज), संजय शेळके (करमाड), संजय वाघ(छ.संभाजीनगर),नवनाथ बांगल(पाचोड), फयाज शेख(अडुळ), भारतसिंघ कुथंबिरे यांचा गौरव करण्यात आला.

 

अधिकाधिक प्रीमियम सिमेंट वापरणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर कॅटेगरीमध्ये :

चंद्रकांत पठारे (वैजापूर),नईम पठाण(सिल्लोड),रंजित राठोड (खुलताबाद),शेख रब्बानी(फुलंब्री), इमरान शेख(वैजापूर), यांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

 

कार्यक्रमाचा समारोप अदानी सिमेंटचे छत्रपती संभाजीनगर इंजिनिअर मुकेश कुलकर्णी सर यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी अंबुजा कंपनीचे जिल्ह्यातील अनेक डीलर उपस्थित होते.

 

संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. कॉन्ट्रॅक्टर बंधूंची उपस्थिती आणि आनंदी सहभाग यामुळे हा गौरव उत्सव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात भव्य कार्यक्रम ठरला, अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment