महानगरपालिकेच्या २० मराठी आणि उर्दू माध्यमाच्या शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय मागे घेवून शैक्षणिक दर्जा सुधारा, विद्यार्थी पटसंख्या कमी होण्यास कारणीभूत असलेल्या सर्वांवर कायदेशिर कारवाई करा.
महानगरपालिकेच्या २० मराठी आणि उर्दू माध्यमाच्या शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय मागे घेवून शैक्षणिक दर्जा सुधारा, विद्यार्थी पटसंख्या कमी होण्यास कारणीभूत असलेल्या सर्वांवर कायदेशिर कारवाई करा.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे
(सचिन खरात गट) जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदन
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
छञपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेने कमी विद्यार्थी संख्येचे कारण देवून २०२३ ते २०२५ या दोन वर्षात मराठी आणि उर्दू माध्यमाच्या २० शाळांना टाळे लावले आहे. महानगरपालिकेच्या सीबीएसई पॅटर्नच्या शाळांमध्ये “प्रवेश फुल्ल” होत असतांना मराठी आणि उर्दू शाळा माञ कमी विद्यार्थी संख्येचे कारण देवून बंद केल्या जात आहे. त्याचे अन्य शाळांमध्ये विलिनीकरण केले जात आहे. नव्या शाळा लांब असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेला मुकाव लागत आहे.
गोरगरीबांच्या मुलांना शिक्षण घेता यावे, याकरिता महानगरपालिकेने शाळा सुरू केलेल्या होत्या. कमी पटसंख्येचे कारण पुढे करत महानगरपालिकेने २०१७ ते २०२५ पर्यत ३२ शाळा बंद केल्या आहेत. महानगरपालिकेच्या शाळेची संख्या ८२ वरून आता ५० वर आली आहे.
बंद करण्यात आलेल्या शाळेपैकी काही शाळा या खाजगी संस्थेला भाडेतत्वार देण्यात आलेल्या आहेत. त्या संस्थेने कोटी रूपयांचे भाडे थकवलेले आहेत. शाळा टिकावी याकरिता शिक्षकांकडून कोणतेच प्रयत्न होतांना दिसत नाही. शाळांमध्ये शिक्षकांची गुणवत्ता सुधारणे, शाळामध्ये मुलभूत सोयीसुविधा देणे, शाळा परिसरात मैदान विकसित करणे, क्रिडा शिक्षक नियुक्त करणे, विविध कार्याशाळा व स्पर्धा घेण्यास प्रोत्साहन देणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे.
महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे. त्यामुळे मराठी शाळा टिकल्या पाहीजे. पटसंख्येचे कारण पुढे करून शाळाचा शैक्षणिक दर्जा न सुधारता त्या शाळा बंद करून खाजगी संस्थाना भाडयाने देण्याचा घाट महानगरपालिकेने घातला आहे. यामुळे शोषीत, वंचित, गरीब घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून मुकावे लागणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या शाळा बंद न करता त्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा, तसेच, महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी पटसंख्या कमी होण्यास कारणीभूत असलेल्या सर्वावर कायदेशिर कारवाई करावी, अशी मागणी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे जिल्हा उपाध्यक्ष योगेश उबाळे यांच्यामार्फत करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन मनपा आयुक्त जी श्रीकांत, व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
