मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

लॉकडाउनंसदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मोठी घोषणा; सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सूचना

On: March 27, 2026 10:05 PM
Follow Us:
---Advertisement---

लॉकडाउनंसदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मोठी घोषणा; सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सूचना

Urvashi Khona | Updated: Mar 27, 2026, 09:48 PM IST

PM Narendra Modi on Lockdown: मध्यपूर्वेतील संघर्षाच्या पाश्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत देशाची तयारी, पुरवठा व्यवस्था आणि संभाव्य परिणामांचा आढावा घेण्यात आला.

PM Narendra Modi on Lockdown:

अमेरिका-इस्रायल

आणि इराण यांच्यात सुरु असलेल्या युद्धाच्या पाश्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत देशाची तयारी, पुरवठा व्यवस्था आणि संभाव्य परिणामांचा आढावा घेण्यात आला. बैठक संपल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी मध्यपूर्वेतील घडामोडींवर सविस्तर सादीकरण करत मुख्यमंत्र्यांना परिस्थितीची माहिती दिली. सूत्रांच्या माहितीनुसार, देशात लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही विचार सध्या नसल्याचंही पंतप्रधानांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना त्यांच्या राज्यांमध्ये कोणत्याही प्रकारे भीतीचं वातावरण निर्माण होणार नाही यासाठी यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले. “आपण सर्वांनी ‘टीम इंडिया’ म्हणून एकत्रित काम केलं पाहिजे. तसं केल्यास ही परिस्थितीही यशस्वीपणे हाताळू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधानांनी यावेळी केंद्र सरकारच्या प्राधान्यक्रमांवरही भर दिला. देशातील आर्थिक आणि व्यापारी स्थिरता कायम राखणे, ऊर्जा सुरक्षेची हमी देणे, नागरिकांचे हित सुरक्षित ठेवणे आणि उद्योग तसेच पुरवठा साखळी मजबूत करणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यांना पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्याच्या सूचना देताना, साठेबाजी आणि नफेखोरीविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले. कृषी क्षेत्रात आगाऊ नियोजनाची गरज अधोरेखित करत खतांच्या साठवण आणि वितरणावर विशेष लक्ष ठेवण्याचेही त्यांनी सांगितले.

तसंच, बदलत्या परिस्थितीला जलद प्रतिसाद देता यावा यासाठी सर्व स्तरांवर मजबूत समन्वय यंत्रणा उभी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सीमावर्ती आणि किनारपट्टीवरील राज्यांनी जहाजवाहतूक, आवश्यक वस्तूंचा पुरवठा आणि सागरी हालचाली यासंदर्भातील आव्हानांकडे विशेष लक्ष द्यावे, असेही त्यांनी नमूद केले. गैरसमज आणि अफवा पसरू नयेत यासाठी अचूक आणि विश्वासार्ह माहितीच प्रसारित करण्याचे महत्त्व अधोरेखित करत पंतप्रधानांनी सतर्कतेचा इशारा दिला.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने उचललेल्या पावलांचे कौतुक केले. जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय आणि राज्यांना व्यावसायिक एलपीजीचे वाढीव वाटप याचेही स्वागत करण्यात आले. राज्यांमध्ये पेट्रोल डिझेल आणि एलपीजीचा परेसा साठा उपलब्ध असल्याचे

सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना त्यांच्या राज्यांमध्ये कोणत्याही प्रकारे भीतीचं वातावरण निर्माण होणार नाही यासाठी यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले. “आपण सर्वांनी ‘टीम इंडिया’ म्हणून एकत्रित काम केलं पाहिजे. तसं केल्यास ही परिस्थितीही यशस्वीपणे हाताळू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधानांनी यावेळी केंद्र सरकारच्या प्राधान्यक्रमांवरही भर दिला. देशातील आर्थिक आणि व्यापारी स्थिरता कायम राखणे, ऊर्जा सुरक्षेची हमी देणे, नागरिकांचे हित सुरक्षित ठेवणे आणि उद्योग तसेच पुरवठा साखळी मजबूत करणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

कोण आहे कोल थॉमस अॅलन ? ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा ‘नासा’शी काय संबंध?

तरुणाकडून वृद्ध आईवर बलात्कार, आधी बेदम मारहाण, नंतर हात-पाय बांधून रात्रभर अत्याचार

Politics News : मुख्यमंत्री १४ एप्रिलला राजीनामा देणार; हालचालींना वेग

आज रात्रीपासून पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन! पंतप्रधान शहबाज शरीफ यांची घोषणा

ईडीनं फास आवळला गौतम कुमार यांनी त्यांच्या प्रेयसीच्या नावे अनेक ठिकाणी जमिनी खरेदी केल्या होत्या. या सगळ्या प्रकरणात ईडीनं फास आवळला आहे. गौतम कुमार यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावण्यात आलं आहे. त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होईल.

यूपीमध्ये मौलवीविरुद्ध दोन ठिकाणी गुन्हे दाखल सोशल मीडियावरील व्हिडिओवरून कारवाई

Leave a Comment