मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

वीजपुरवठा सुरू होण्याआधीच विद्युत खांब कोसळले; नागरिकांकडून संताप व्यक्त

On: May 30, 2026 7:25 PM
Follow Us:
---Advertisement---

वीजपुरवठा सुरू होण्याआधीच विद्युत खांब कोसळले; नागरिकांकडून संताप व्यक्त

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

जाफराबाद प्रतिनिधी : मोहम्मद बाईयाश

 

जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी फाटा ते डोलखेडा रस्त्यावर वीजपुरवठा सुरू होण्याआधीच विद्युत खांब कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे महावितरणच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

 

माहितीनुसार, सुमारे महिनाभरापूर्वी वीज वितरण कंपनीमार्फत संबंधित भागात नवीन विद्युत खांब उभारण्याचे व तार ओढण्याचे काम ठेकेदाराकडून करण्यात आले होते. मात्र, हे खांब रस्त्यालगतच्या मोकळ्या व सैल मातीत रोवण्यात आल्याने ते मजबूत आधार न मिळाल्यामुळे कोसळल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

 

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी खांब सरळ रेषेत उभारण्यात आलेले नाहीत. तसेच आवश्यक त्या ठिकाणी ताण (सपोर्ट) न दिल्याने संपूर्ण लाईनची स्थिरता धोक्यात आली आहे. त्यामुळे संबंधित कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

 

परिसरात दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. या वादळी हवामानामुळेच कमकुवत पायाभरणी असलेले खांब कोसळल्याचे स्थानिक नागरिक योगेश बंगाळे यांनी सांगितले.

 

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी रस्त्यावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोसळलेले विद्युत खांब तात्काळ उभे करून कामाची चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक आणि प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

पाणी पिऊन उपोषण मागे नाही, केवळ ‘लाड भाऊं’च्या आग्रहास्तव घोटभर पाणी; सर्व मागण्यांवर तीन दिवसांत अंमलबजावणी करा, अन्यथा…

टेंभुर्णीत वानरांचा धुमाकूळः तीन जण गंभीर जखमी, वनविभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप

अवैध धंद्यांच्या विरोधात टेंभुर्णी पोलीस ‘ॲक्शन मोड’वर! खबरदार… अवैध धंदे कराल तर खावी लागेल जेलची हवा! .

वाघरुळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी

गाडेगव्हाण रस्त्यावर चिखल अन् घाणीचे साम्राज्य ! शाळकरी मुलांची जीवघेणी कसरत; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष तक्रारीनंतरही तात्पुरत्या मलमपट्टीचा प्रयत्न; थेट सिमेंट रस्त्याची गावकऱ्यांची ठाम मागणी

Leave a Comment