मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

संपादक संतोष भुतेकर यांच्यावरील गुटखा माफिया हल्ल्याचा टेंभुर्णीत निषेध;

On: June 4, 2026 1:12 PM
Follow Us:
---Advertisement---

पत्रकार संतोष भुतेकर यांच्यावरील हल्ल्याचा टेंभुर्णीत निषेध;

 

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

जाफराबाद : प्रतिनिधी

दैनिक ‘जगाचा जगमित्र’चे संपादक संतोष भुतेकर यांच्यावर गुटखा माफियांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा टेंभुर्णी मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड यांना निवेदन देऊन संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

*पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कारवाईची मागणी*
सदरील निवेदनात म्हटले आहे की, “अवैध धंदे करणारे गुटखा माफिया बातम्या छापल्या म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवर हल्ले करत असतील तर हे गंभीर आहे. अशा गुन्हेगारांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी.”

*पोलिसांना निवेदन सादर*
टेंभुर्णी मराठी पत्रकार संघाच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड यांना निवेदन देताना सुनील भाले, रावसाहेब अंभोरे, पी. जी. तांबेकर, नसीम शेख, संजय राऊत, गजानन देठे, बी. डी. सवडे, अलकेश सोमाणी, बालाजी शेवाळे, साबेर शेख, फकरू कुरेशी, गजानन शेळके, सुनील जोशी, आशपाक शेख, आशिष पैठणे शेख इंभ्रान शेख गफुर शेख असद भिकन खाँ पठाण आदी पत्रकार उपस्थित होते.

पत्रकारांवर होणारे हल्ले हा लोकशाहीवरचाच हल्ला असून पोलिसांनी अवैध गुटखा विक्री करणाऱ्या माफियांवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा पत्रकार संघातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

पाणी पिऊन उपोषण मागे नाही, केवळ ‘लाड भाऊं’च्या आग्रहास्तव घोटभर पाणी; सर्व मागण्यांवर तीन दिवसांत अंमलबजावणी करा, अन्यथा…

टेंभुर्णीत वानरांचा धुमाकूळः तीन जण गंभीर जखमी, वनविभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप

अवैध धंद्यांच्या विरोधात टेंभुर्णी पोलीस ‘ॲक्शन मोड’वर! खबरदार… अवैध धंदे कराल तर खावी लागेल जेलची हवा! .

वाघरुळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी

गाडेगव्हाण रस्त्यावर चिखल अन् घाणीचे साम्राज्य ! शाळकरी मुलांची जीवघेणी कसरत; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष तक्रारीनंतरही तात्पुरत्या मलमपट्टीचा प्रयत्न; थेट सिमेंट रस्त्याची गावकऱ्यांची ठाम मागणी

Leave a Comment