मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

पत्रकारांना धमकीप्रकरणी खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात टेंभुर्णीत निषेध

On: June 26, 2026 7:32 PM
Follow Us:
---Advertisement---

पत्रकारांना धमकीप्रकरणी खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात टेंभुर्णीत निषेध

 

गुन्हा दाखल करून राजीनाम्याची मागणी; मराठी पत्रकार संघाचे पोलीसांना निवेदन

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

जाफराबाद | प्रतिनिधी

 

ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी कथितरित्या अश्लील भाषेत वागणूक देत धमक्या दिल्याच्या घटनेचा जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून नैतिक जबाबदारी स्वीकारत खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

 

टेंभुर्णी मराठी पत्रकार संघाची तातडीची बैठक संघटनेचे अध्यक्ष शेख साबेर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीनंतर संघाच्या शिष्टमंडळाने टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड यांना निवेदन सादर केले.

 

निवेदनात म्हटले आहे की, पक्षांतरानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर खासदार संजय दिना पाटील यांनी शासकीय अधिकारी व पोलीस अंगरक्षकांसमोर पत्रकारांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना अशा प्रकारे धमकावणे हे अत्यंत निषेधार्ह असून लोकशाही मूल्यांना धक्का देणारे कृत्य असल्याचे मराठी पत्रकार संघाने नमूद केले.

 

बैठकीत उपस्थित पत्रकारांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत खासदार संजय दिना पाटील यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची तसेच त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून खासदारकीचा राजीनामा देण्याची मागणी केली.

 

यावेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख साबेर यांच्यासह रानाअंभोरे, शेख नसीम, अलकेश सोमाणी, बी. डी. सवडे, गजानन देठे, विष्णू मगर, प्रताप नवले, अशोक पाबळे, सुनील भाले, फकरु कुरेशी, मोहम्मद बाईय्यास, सुनील जोशी, प्रल्हाद जाधव, शेख आशपाक आदी पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

कुंभारझरी येथील वारकरी धर्म संकिर्तन सेवा प्रतिष्ठानला निर्मल दिंडी पुरस्कार २०२६जाहीर.

टेंभुर्णी येथील राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती उत्साहात साजरी*

टेंभुर्णी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार; कर भरूनही नागरिकांना कागदपत्रांसाठी हेलपाटे ग्रामसेवकासह पर्यायी अधिकारीही गैरहजर; स्वच्छता, पाणीपुरवठा व प्रशासकीय कामांवर परिणाम

जाफराबाद (प्रतिनिधी): जाफराबाद ते जळगाव ही एसटी बससेवा पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी जाफराबाद शहरातील व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.

टेंभुर्णीचा बस स्टैंड की केवळ कागदावरचा भुलभुलय्या?’ पुढाऱ्यांनो, आमच्या हक्काचा बस स्टँड कधी मिळणार? जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी जनतेचा संतप्त सवाल

Leave a Comment