मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

प्रेषित मोहम्मद पैगंबर व त्यांच्या पत्नी बद्दल आपत्ती जनक वक्तव्य करुन मुस्लिम समाज बांधवांची धार्मिक भावना दुखावणारी समाज कंटक नाजिया इलाही खान विरुद्ध कडक करा

On: June 28, 2026 6:23 PM
Follow Us:
---Advertisement---

 

प्रेषित मोहम्मद पैगंबर व त्यांच्या पत्नी बद्दल आपत्ती जनक वक्तव्य करुन मुस्लिम समाज बांधवांची धार्मिक भावना दुखावणारी समाज कंटक नाजिया इलाही खान विरुद्ध कडक करा

फुलंब्री / दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

 

प्रेषित मोहम्मद पैगंबर व त्यांच्या पत्नी बद्दल आपत्ती जनक वक्तव्य करुन मुस्लिम समाज बांधवांची धार्मिक भावना दुखावणारी समाज कंटक नाजिया इलाही खान विरुद्ध कडक कारवाई करुन जेरबंद करण्या साठी फुलंब्री पोलीस ठाणे येथे समस्त मुस्लिम समाज तर्फे तक्रार देण्यात आली आहे. २६ जुन शुक्रवारी नमाज नंतर समस्त मुस्लिम समाज च्या वतीने समाज कंटक नाजीया इलाही खान च्या आपत्तीजनक वक्तव्याचा निषेध करुन एका शिष्टमंडळा तर्फे पोलीस निरीक्षक फुलंब्री यांना रितसर निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले की सोशल

 

मीडिया च्या माध्यमातून नाजीया इलाही खान नामक महिले ने जाणून बुजून धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रेषित मोहम्मद पैगंबर (स) व त्यांच्या पत्नी बद्दल अश्लिल अपशब्द बोलुन आपत्ती जनक वक्तव्य करुन मुस्लिम समाज बांधवांची धार्मिक भावनेला ठेच पोहचवली आहे. तसेच मुस्लीम समाजा विषयी सुध्दा अश्लील, कल्पनिय बनावट व्हिडीओ करून सोशल मिडीयावर वायलर करत आहे व हिंदू मुस्लीम समाजामध्ये तणाव निर्माण होईल अश्या भाषेचा वापर करुन गैर कृत्य करत आहे. जेणे करुन देशाची सुरक्षा व शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत आहे. समाज कंटक नाजीया खान ने केलेल्या आपत्तीजनक वक्तव्याचा

 

आम्ही सर्व मुस्लिम बांधव निषेध करत आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर बद्दल कोणत्याही प्रकारचे अपशब्द व आपत्तीजनक वक्तव्य करणाऱ्यांना मुस्लिम समाज खपवुन घेणार नाही याची नोंद घ्यावी व सोशल मीडियावर प्रेषित मोहम्मद पैगंबर (स.) व त्यांची

 

पत्नी बद्दल अश्लील शब्द बोलुन व्हिडीओ बायलर केल्यामुळे समाज कंटक महिला नाजीया इलाही खान वर तात्काळ कायदेशीर कडक कारवाई करून जेरबंद करावे अशी मागणी सुज्ञ मुस्लिम समाज बांधवां तर्फे करण्यात आली आहे. या निवेदनावर २२ नागरीकांचे सह्या आहेत. पोलिस प्रशासनाने आश्वासन दिले की कारवाई करण्यात येईल. यावेळी सलमान पटेल, शेरु, जमाल शेख, इम्रान खान, परवेज महेबुब पठान रईस अबुजर पटेल कैफ नूर पठाण जुनैद खान निसार पटेल तय्यब शहाबबलु भिकन शेख अनिस पटेल अशपाक पटेल, सरफराज पटेल, शाहरूख शहा यांच्या सह आदींची उपस्थिती होती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

पाणी पिऊन उपोषण मागे नाही, केवळ ‘लाड भाऊं’च्या आग्रहास्तव घोटभर पाणी; सर्व मागण्यांवर तीन दिवसांत अंमलबजावणी करा, अन्यथा…

टेंभुर्णीत वानरांचा धुमाकूळः तीन जण गंभीर जखमी, वनविभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप

अवैध धंद्यांच्या विरोधात टेंभुर्णी पोलीस ‘ॲक्शन मोड’वर! खबरदार… अवैध धंदे कराल तर खावी लागेल जेलची हवा! .

वाघरुळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी

गाडेगव्हाण रस्त्यावर चिखल अन् घाणीचे साम्राज्य ! शाळकरी मुलांची जीवघेणी कसरत; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष तक्रारीनंतरही तात्पुरत्या मलमपट्टीचा प्रयत्न; थेट सिमेंट रस्त्याची गावकऱ्यांची ठाम मागणी

Leave a Comment