मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

उपवर्गीकरणाच्या विरोधात जाफ्राबाद येथे बाविस दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू मात्र प्रशिक्षित उपजिल्हाधिकारी असलेल्या तहसीलदाराने नाही पाठविला वरिष्ठांकडे दरदिवशी चा अहवाल

On: July 9, 2026 9:33 PM
Follow Us:
---Advertisement---

उपवर्गीकरणाच्या विरोधात जाफ्राबाद येथे बाविस दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू

 

 

मात्र प्रशिक्षित उपजिल्हाधिकारी असलेल्या तहसीलदाराने नाही पाठविला वरिष्ठांकडे दरदिवशी चा अहवाल

 

 

 

 

जाफ्राबाद प्रतिनिधि : मोहम्मद बाईयाश

सरकारने घाट घातलेल्या अनुसूचित जाती (एससी) आरक्षणाच्या अ.ब.क.ड उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेला विरोध म्हणून जाफ्राबाद तहसील कार्यालयासमोर दररोज एक-एका गावातील उपोषणकर्ते साखळी उपोषणात होतात सहभागी होऊन सामुदायिक रीत्या बेमुदत साखळी उपोषण करत असून आज (दि.१८ जुन) बाविसावा दिवस आहे.

मात्र प्रशिक्षित उपजिल्हाधिकारी असलेल्या तहसीलदाराने वरिष्ठांना नाही पाठविला दरदिवशी चा अहवाल.

महाराष्ट्र राज्यामध्ये उपवर्गीकरणाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जाफ्राबाद तालुक्याच्या वतीने समस्त बौद्ध समाज व अनुसूचित जातीतील विविध समाज घटकांच्या नेतृत्वाखाली दिनांक १८ जून २०२६ पासून तहसील कार्यालय,जाफ्राबाद येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे.

या प्रक्रियेमुळे अनुसूचित जातींमध्ये मतभेद निर्माण होऊन सामाजिक ऐक्याला बाधा पोहोचून दोन समाजामध्ये वैमनस्य वाढून जातीय सलोखा बिघडू शकतो असा आठ्ठावन्न जातीतील समाज बांधवांचा समज झाला आहे.

म्हणून अनुसूचित जाती (एससी) आरक्षणाचे अ.ब.क.ड उपवर्गीकरण तात्काळ रद्द करण्यात यावे.अनुसूचित जातींचे घटनात्मक हक्क अबाधित ठेवून विद्यमान संविधानिक आरक्षण व्यवस्थेचे संरक्षण करण्यात यावे.अनंत बदर समितीने राज्यातील सर्व अनुसूचित जाती घटकांचा समावेशक व प्रत्यक्ष अभ्यास केलेला नसल्याचा आंदोलकांचा आरोप आहे.समितीसमोर दावे व हरकती सादर करण्यासाठी देण्यात आलेल्या मुदतीत वाढ करण्यात यावी तसेच प्राप्त सर्व हरकतींवर सुनावणी घेऊन न्याय्य कारक निर्णय करण्यात यावा. शासनाने उपवर्गीकरणा संदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत जनगणना आकडेवारीचा आधार घ्यावा. तसेच राज्यातील सर्व अनुसूचित जाती घटकांचे प्रतिनिधित्व असलेली स्वतंत्र अभ्यास समिती व तज्ज्ञ समिती गठित करून त्यामध्ये बौद्ध समाजासह सर्व प्रमुख अनुसूचित जाती समाजघटकांच्या प्रतिनिधींना स्थान द्यावे.आणि महत्वपूर्ण म्हणजे न्यायमूर्ती अनंत बदर समिती तात्काळ रद्द करण्यात यावी.

या मागणी साठी १८/६ ला आरदखेडा,१९ ला बोरगाव,

२० वरखेडा,२१ देळेगव्हाण,२२खामखेडा,२३ संयोजन समितीचे पदाधिकारी,२४ हिवरा काबली,२५ संयोजन समितीचे पदाधिकारी,२६ कुंभारझरी,२७ देऊळझरी,२८ काळेगाव,२९ सोनखेडा,३०जवखेडा,१जुलै ला डावरगाव,२लानिमखेडा (कोरडे ),३ ला मंगरूळ,४ ला तपोवन,०५ हिवरा बळी,०६ मठ बोरगाव/बोरी,०७ कोल्हापूर,०८ गोधनखेडा,०९ ला निमखेडा इत्यादी गावातील महिला आणि पुरुषांनी साखळी उपोषणात सहभागी नोंदविला असून जोपर्यंत शासन उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेला निर्णय रद्द करत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरू च राहिलं असे समस्त बौद्ध समाज बांधवांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

दरम्यान आंदोलकांनी स्पष्ट केले आहे की,जाफ्राबाद तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना,सर्व राजकीय पक्ष,विविध समाजघटक व नागरिकांनी एकत्र घेऊन येत्या काळात जाफ्राबाद येथे रास्ता रोको,पुरुष/मुलं मुंडन आंदोलन,थाळी वाजवून शांततापूर्ण,संविधानिक मार्गाने व कायद्याचे पालन करून सुरू आहे. शासनाने या बेमुदत साखळी उपोषणाची तातडीने दखल न घेतल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन,मोर्चे व इतर लोकशाही मार्गांचा अवलंब करण्यात येईल,असा इशारा समस्त बौद्ध समाज एससी उपवर्गीकरण विरोधी समन्वय समिती तालुका जाफ्राबाद, जिल्हा जालना यांच्या वतीने आयोजकांनी दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

जिल्हा परिषद शाळेचा ऐतिहासिक निकाल! 8 पैकी 7 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक मेहनत, जिद्द आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाने मिळवले यश -विद्यार्थी व पालकांचा सत्कार

कुंभारझरी येथील वारकरी धर्म संकिर्तन सेवा प्रतिष्ठानला निर्मल दिंडी पुरस्कार २०२६जाहीर.

टेंभुर्णी येथील राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती उत्साहात साजरी*

टेंभुर्णी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार; कर भरूनही नागरिकांना कागदपत्रांसाठी हेलपाटे ग्रामसेवकासह पर्यायी अधिकारीही गैरहजर; स्वच्छता, पाणीपुरवठा व प्रशासकीय कामांवर परिणाम

जाफराबाद (प्रतिनिधी): जाफराबाद ते जळगाव ही एसटी बससेवा पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी जाफराबाद शहरातील व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment