मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

मला माझ्या बापाला मरताना नाही बघायचं…” – ‘सैराट’ फेम अभिनेता अरबाज शेखचे भावनिक मदतीचे आवाहन

On: July 9, 2026 10:34 PM
Follow Us:
---Advertisement---

दैनिक शब्दमत

दि. ९ जुलै २०२६ | प्रतिनिधी

 

“मला माझ्या बापाला मरताना नाही बघायचं…” – ‘सैराट’ फेम अभिनेता अरबाज शेखचे भावनिक मदतीचे आवाहन

 

‘सैराट’ चित्रपटातून प्रसिद्धी मिळालेला अभिनेता अरबाज शेख सध्या अत्यंत कठीण प्रसंगातून जात असून, आपल्या वडिलांच्या उपचारांसाठी त्याने सोशल मीडियावर भावनिक मदतीचे आवाहन केले आहे. “मला माझ्या बापाला मरताना नाही बघायचं…” असे म्हणत त्याने आपल्या व्यथा मांडल्या आहेत.

 

अरबाजच्या माहितीनुसार, वडिलांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला उपचारासाठी सुमारे ७० हजार रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर काही औषधे रुग्णालयातील मेडिकलमधूनच खरेदी करण्यास सांगितल्याचा त्याचा दावा आहे. हीच औषधे बाहेर कमी किमतीत उपलब्ध असताना रुग्णालयातील मेडिकलमध्ये जास्त दर आकारले जात असल्याचा आरोप त्याने केला आहे.

 

या अनुभवामुळे अरबाजने वडिलांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. मात्र तेथेही समाधानकारक अनुभव न आल्याने तो भावूक झाला आणि सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे मदतीचे आवाहन केले. योग्य उपचारासाठी कोणत्या रुग्णालयात जावे, हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा असल्याचे त्याने सांगितले.

 

अरबाजच्या या भावनिक आवाहनाला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत असून, चाहते आणि अनेक नागरिक त्याच्या वडिलांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करत आहेत.

 

(टीप : वरील वृत्त हे अभिनेता अरबाज शेख यांनी सोशल मीडियावर केलेल्या दाव्यांवर आधारित आहे. संबंधित रुग्णालयांची अधिकृत भूमिका उपलब्ध झाल्यानंतर ती प्रसिद्ध करण्यात येईल.)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

पाणी पिऊन उपोषण मागे नाही, केवळ ‘लाड भाऊं’च्या आग्रहास्तव घोटभर पाणी; सर्व मागण्यांवर तीन दिवसांत अंमलबजावणी करा, अन्यथा…

टेंभुर्णीत वानरांचा धुमाकूळः तीन जण गंभीर जखमी, वनविभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप

अवैध धंद्यांच्या विरोधात टेंभुर्णी पोलीस ‘ॲक्शन मोड’वर! खबरदार… अवैध धंदे कराल तर खावी लागेल जेलची हवा! .

वाघरुळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी

गाडेगव्हाण रस्त्यावर चिखल अन् घाणीचे साम्राज्य ! शाळकरी मुलांची जीवघेणी कसरत; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष तक्रारीनंतरही तात्पुरत्या मलमपट्टीचा प्रयत्न; थेट सिमेंट रस्त्याची गावकऱ्यांची ठाम मागणी

Leave a Comment