मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

जाफराबाद (प्रतिनिधी): जाफराबाद ते जळगाव ही एसटी बससेवा पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी जाफराबाद शहरातील व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.

On: July 18, 2026 6:21 PM
Follow Us:
---Advertisement---

. जाफराबाद–जळगाव बससेवा तातडीने सुरू करण्याची व्यापारी व नागरिकांची मागणी

  • दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

जाफराबाद (प्रतिनिधी): जाफराबाद ते जळगाव ही एसटी बससेवा पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी जाफराबाद शहरातील व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.

 

सध्या या मार्गावर थेट एसटी बससेवा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असून, त्यामुळे आर्थिक भुर्दंड तसेच वेळेचा अपव्यय होत आहे. जळगाव येथे शिक्षण, नोकरी, शासकीय कामे, व्यवसाय आणि वैद्यकीय उपचारांसाठी दररोज मोठ्या संख्येने प्रवासी ये-जा करतात.

 

व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, जाफराबाद–जळगाव बससेवा सुरू झाल्यास प्रवाशांची मोठी सोय होईल. तसेच जाफराबाद आगाराच्या उत्पन्नातही वाढ होण्यास मदत होईल. त्यामुळे ही बससेवा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

 

याबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक निर्णय घेऊन जाफराबाद–जळगाव बससेवा तातडीने सुरू करावी, अशी अपेक्षा व्यापारी व नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

पाणी पिऊन उपोषण मागे नाही, केवळ ‘लाड भाऊं’च्या आग्रहास्तव घोटभर पाणी; सर्व मागण्यांवर तीन दिवसांत अंमलबजावणी करा, अन्यथा…

टेंभुर्णीत वानरांचा धुमाकूळः तीन जण गंभीर जखमी, वनविभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप

अवैध धंद्यांच्या विरोधात टेंभुर्णी पोलीस ‘ॲक्शन मोड’वर! खबरदार… अवैध धंदे कराल तर खावी लागेल जेलची हवा! .

वाघरुळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी

गाडेगव्हाण रस्त्यावर चिखल अन् घाणीचे साम्राज्य ! शाळकरी मुलांची जीवघेणी कसरत; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष तक्रारीनंतरही तात्पुरत्या मलमपट्टीचा प्रयत्न; थेट सिमेंट रस्त्याची गावकऱ्यांची ठाम मागणी

Leave a Comment