मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

टेंभुर्णी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार; कर भरूनही नागरिकांना कागदपत्रांसाठी हेलपाटे ग्रामसेवकासह पर्यायी अधिकारीही गैरहजर; स्वच्छता, पाणीपुरवठा व प्रशासकीय कामांवर परिणाम

On: July 21, 2026 7:15 PM
Follow Us:
---Advertisement---

टेंभुर्णी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार; कर भरूनही नागरिकांना कागदपत्रांसाठी हेलपाटे
ग्रामसेवकासह पर्यायी अधिकारीही गैरहजर; स्वच्छता, पाणीपुरवठा व प्रशासकीय कामांवर परिणाम

जाफराबाद / प्रतिनिधी दैनिक शब्दमत न्युज

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ग्रामपंचायतीकडे घरपट्टी व इतर कर भरूनही नागरिकांना आवश्यक कागदपत्रे वेळेत मिळत नसल्याची तक्रार असून, नमुना क्रमांक ८ तसेच इतर महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी नागरिकांना महिनाभरापासून ग्रामपंचायतीचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

माहितीनुसार, संबंधित नागरिकाने सर्व कराची रक्कम नियमानुसार भरल्यानंतरही आवश्यक कागदपत्रे अद्याप मिळालेली नाहीत. प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगून नागरिकांना परत पाठविले जात असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

विशेष म्हणजे, ग्रामसेवक रजेवर गेल्यानंतर त्यांच्या जागी पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली असतानाही संबंधित पर्यायी अधिकारी नियमितपणे ग्रामपंचायतीत हजर राहत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज अक्षरशः ठप्प झाले असून, स्वच्छता, पाणीपुरवठा, दाखले वाटप, करसंबंधित कामे व नागरिकांच्या तक्रारींचे निवारण रखडले आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायतीत जबाबदार अधिकारी अनुपस्थित राहत असल्याने नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. वेळेत सेवा न मिळाल्यामुळे बँक, महसूल, शेती तसेच इतर शासकीय कामांनाही विलंब होत आहे.

टेंभुर्णी ग्रामपंचायतीतील या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ग्रामसेवक आणि पर्यायी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची चौकशी करून निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच ग्रामपंचायतीतील नागरिकांना तातडीने सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

पाणी पिऊन उपोषण मागे नाही, केवळ ‘लाड भाऊं’च्या आग्रहास्तव घोटभर पाणी; सर्व मागण्यांवर तीन दिवसांत अंमलबजावणी करा, अन्यथा…

टेंभुर्णीत वानरांचा धुमाकूळः तीन जण गंभीर जखमी, वनविभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप

अवैध धंद्यांच्या विरोधात टेंभुर्णी पोलीस ‘ॲक्शन मोड’वर! खबरदार… अवैध धंदे कराल तर खावी लागेल जेलची हवा! .

वाघरुळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी

गाडेगव्हाण रस्त्यावर चिखल अन् घाणीचे साम्राज्य ! शाळकरी मुलांची जीवघेणी कसरत; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष तक्रारीनंतरही तात्पुरत्या मलमपट्टीचा प्रयत्न; थेट सिमेंट रस्त्याची गावकऱ्यांची ठाम मागणी

Leave a Comment