मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

टेंभुर्णी येथील राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती उत्साहात साजरी*

On: July 25, 2026 9:00 AM
Follow Us:
---Advertisement---

टेंभुर्णी येथील राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती उत्साहात साजरी*

 

जाफराबाद प्रतिनिधि : मोहम्मद बाईयाश

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल, टेंभुर्णी येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

 

यावेळी. स्वराज फलके , आराध्या उबरहंडे, रणवीर म्हस्के, आरुषी जाधव, सृष्टी सतीश चके, सृष्टी तायडे, नयना मोरे, स्वरूपा उखर्डे, आर्यन खांडेभराड , शिवराज जगदाळे, ऋतुजा मोरे विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्यावर भाषणे सादर केली. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हा त्यांचा प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. मुख्याध्यापक संजय फलटणकर यांनी टिळकांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, शिक्षण, समाजजागृती आणि राष्ट्रनिर्मितीतील कार्य याविषयी मार्गदर्शन केले. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सवांद्वारे राष्ट्रीय एकात्मता आणि स्वातंत्र्याची प्रेरणा दिली, यावर विशेष प्रकाश टाकण्यात आला.

 

कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य श्री. संजय फलटणकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनिता सुद्रिक यांनी केले तर शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

पाणी पिऊन उपोषण मागे नाही, केवळ ‘लाड भाऊं’च्या आग्रहास्तव घोटभर पाणी; सर्व मागण्यांवर तीन दिवसांत अंमलबजावणी करा, अन्यथा…

टेंभुर्णीत वानरांचा धुमाकूळः तीन जण गंभीर जखमी, वनविभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप

अवैध धंद्यांच्या विरोधात टेंभुर्णी पोलीस ‘ॲक्शन मोड’वर! खबरदार… अवैध धंदे कराल तर खावी लागेल जेलची हवा! .

वाघरुळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी

गाडेगव्हाण रस्त्यावर चिखल अन् घाणीचे साम्राज्य ! शाळकरी मुलांची जीवघेणी कसरत; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष तक्रारीनंतरही तात्पुरत्या मलमपट्टीचा प्रयत्न; थेट सिमेंट रस्त्याची गावकऱ्यांची ठाम मागणी

Leave a Comment