मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

जिल्हा परिषद शाळेचा ऐतिहासिक निकाल! 8 पैकी 7 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक मेहनत, जिद्द आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाने मिळवले यश -विद्यार्थी व पालकांचा सत्कार

On: July 28, 2026 10:40 PM
Follow Us:
---Advertisement---

जिल्हा परिषद शाळेचा ऐतिहासिक निकाल! 8 पैकी 7 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक

मेहनत, जिद्द आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाने मिळवले यश – विद्यार्थी व पालकांचा सत्कार

 

 

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

 जाफ्राबाद प्रतिनिधी : मोहम्मद बाईयाश

 

जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेने शैक्षणिक क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे. नुकत्याच झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत या शाळेतील 8 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 7 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून जिल्हा परिषद शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.

 

या उल्लेखनीय यशाबद्दल शालेय समितीच्या वतीने शाळेत भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यशस्वी विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला.

 

मेहनतीला पर्याय नाही” – विद्यार्थ्यांनी सांगितला यशाचा मंत्र

सत्काराला उत्तर देताना विद्यार्थ्यांनी आपल्या यशामागील मेहनत, अभ्यासाची शिस्त आणि शिक्षकांचे मार्गदर्शन याबद्दल सविस्तर माहिती दिली. दररोज नियमित अभ्यास, शंका निवारण आणि आत्मविश्वास यामुळेच हे यश मिळाले असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

 

यावेळी विद्यार्थिनी *कु. पूर्वा अविनाश बिलगे* हिने सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केले की, “पुढच्या वर्षी आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत बसावे. मेहनत केली तर कोणतेही ध्येय अशक्य नाही.”

 

*शिक्षक आणि शालेय समितीचे कौतुक*

शाळेचे मुख्याध्यापक *अशोक हरकळ* सर म्हणाले की, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अफाट क्षमता आहे. फक्त त्यांना योग्य दिशा आणि प्रोत्साहनाची गरज असते. आमच्या शिक्षकांच्या अथक परिश्रमामुळे हे यश मिळाले आहे.”

 

शालेय समितीचे *रावसाहेब अंभोरे, सतीश खरात* यांनी देखील विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षक दशरथ खरात, प्रणिता आव्हाळे, मंगला साने, आनंदा माने,भगवान सानप, गणेशदेशपांडे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित केले.

 

उपस्थित मान्यवर

या कार्यक्रमाला मुख्याध्यापक अशोक हरकळ, शालेय समिती सदस्य, शिक्षकवृंद तसेच यशस्वी विद्यार्थिनी पूर्वा बिलगे, तिचे वडील अविनाश बिलगे आणि आई यांची उपस्थिती होती.

 

गावासाठी अभिमानाची बाब

टेंभुर्णी शाळेच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी देखील शिष्यवृत्ती सारख्या मोठ्या परीक्षेत यश मिळवू शकतात, हा संदेश या निकालातून मिळाला आहे. यामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे. सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले

 

.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

पाणी पिऊन उपोषण मागे नाही, केवळ ‘लाड भाऊं’च्या आग्रहास्तव घोटभर पाणी; सर्व मागण्यांवर तीन दिवसांत अंमलबजावणी करा, अन्यथा…

टेंभुर्णीत वानरांचा धुमाकूळः तीन जण गंभीर जखमी, वनविभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप

अवैध धंद्यांच्या विरोधात टेंभुर्णी पोलीस ‘ॲक्शन मोड’वर! खबरदार… अवैध धंदे कराल तर खावी लागेल जेलची हवा! .

वाघरुळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी

गाडेगव्हाण रस्त्यावर चिखल अन् घाणीचे साम्राज्य ! शाळकरी मुलांची जीवघेणी कसरत; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष तक्रारीनंतरही तात्पुरत्या मलमपट्टीचा प्रयत्न; थेट सिमेंट रस्त्याची गावकऱ्यांची ठाम मागणी

Leave a Comment