मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

पैठणच्या पिंपळवाडी MIDC हद्दीत मटका आणि चक्री जुगाराचा उघडामाळ; पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष?

On: September 18, 2026 6:57 PM
Follow Us:
---Advertisement---

 

पैठणच्या पिंपळवाडी MIDC हद्दीत मटका आणि चक्री जुगाराचा उघडामाळ; पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष?

पैठण (प्रतिनिधी): दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

पैठण तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळवाडी एमआयडीसी हद्दीत आणि पिंपळवाडी (पिराची) परिसरात सध्या उघडपणे मटका आणि चक्री जुगार सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. MIDC पोलीस ठाण्याच्या अगदी जवळच तब्बल ५ चकऱ्या बिनदिक्कतपणे चालविल्या जात असून, या बेकायदेशीर धंद्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

हप्त्यांचे गणित अन् कारवाईवर प्रश्नचिन्ह

स्थानिक नागरिकांच्या चर्चेनुसार, एका चकरीमागे तब्बल १ लाख २५ हजार रुपयांचा ‘मंथली’ हप्ता जात असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. “पोलीस ठाण्याच्या नाकाखाली हे अवैध धंदे सुरू असताना पोलीस निरीक्षक मोरे साहेबांना हे दिसत नाही का?” असा थेट सवाल आता नागरिक विचारत आहेत. पोलीस प्रशासनाच्या या कथित ‘आशीर्वादा’मुळेच जुगार माफियांचे धाडस वाढल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

भीतीचे वातावरण; तक्रारीनंतरही कारवाई शून्य

जुगार चालकांच्या दहशतीमुळे सामान्य नागरिक उघडपणे तक्रार करण्यास घाबरत आहेत. तरीही गावातील पोलीस पाटील आणि ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. तक्रार देऊनही प्रशासन गप्प का, असा सवाल पिंपळवाडीचे नागरिक करत आहेत.

पोलीस अधीक्षक महोदय, लक्ष देणार का?

एमआयडीसी परिसर आणि पिंपळवाडीतील तरुणाई अन् कामगार वर्ग या जुगाराच्या विळख्यात अडकून उद्ध्वस्त होत आहे. स्थानिक पोलिसांकडून कोणतीही दाद मिळत नसल्याने, “आता छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक तरी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकाऱ्यांवर व जुगार माफियांवर कडक कारवाई करतील का?” याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष

लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

डेनिस घोटाळ्यानंतर ठेकेदार फरार; हिनानगर, पटेलनगरवासीयांचे हाल! लोकप्रतिनिधींचे मौन, महापालिका अधिकाऱ्यांच्या मेहेरबानीवर बनावट बिलांचा उठाव; नागरिकांचा गुंठेवारी शुल्क भरण्यास नकार -भाग १

कन्नड तालुक्यातील वाघुळखेडा येथे वीज पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तीन जण गंभीर   शेतातून घरी परतताना कोसळली काळाची कुऱ्हाड  * गावावर शोककळा; आमदार संजना जाधव यांनी घेतली कुटुंबियांची भेट

गजानन महाराज मंदिर परिसरात मंगळसूत्र लांबवणारी महिलांची टोळी जेरबंद; जवाहरनगर पोलिसांची धडक कारवाई ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; ३ महिला आरोपींना अटक

प्रतिबंधित दुर्मीळ कासवाची तस्करी करणारे पाच आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची शिताफीने कारवाई; ईरटीका वाहनातून जिवंत कासव जप्त

रोपळेकर चौक बॅग स्नेचिंग प्रकरण: जवाहरनगर पोलिसांची धडक कारवाई; आरोपी १२ तासांत गजाआड, ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

Leave a Comment